जळगाव : विविध मागण्यांसाठी वाहतूकदार तसेच रिक्षा चालकांतर्फे राज्यभर सुरू असलेल्या चक्काजाम आंदोलनाला शहरातील प्रवासी तसेच वाहतूक चालक संघटनांनी पाठिंबा दर्शविला़ पण या बंदला हिंसक वळण लागले. सायंकाळी शहरातील नेहरू चौकात बंदचे आवाहन ङिाडकारून प्रवासी वाहतूक केली म्हणून दोन रिक्षांच्या काचा फोडण्यात आल्या. काही रिक्षाचालकांनी दादागिरी करीत प्रवाशांना रिक्षामधून खाली उतरविले. बंदमुळे शाळकरी विद्याथ्र्याचे हाल झाल़े अनेक विद्याथ्र्यानी शाळांना दांडी मारली. बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला़शहरात नोकरी, उद्योग, शासकीय कामकानिमित्त पाचोरा, चाळीसगाव, भुसावळ आदी तालुक्यांमधून हजारोंच्या संख्येने नागरिक रेल्वेने शहरात नियमित दाखल होतात़ महाविद्यालयांमुळे या संख्येत विद्याथ्र्याची भर पडत़े रेल्वे स्थानकावरून औद्योगिक वसाहत, विद्यापीठ तसेच महाविद्यालये एक ते दोन किलोमीटरच्या अंतरावर असल्याने रिक्षांमधून जाण्याशिवाय पर्याय नाही़ रिक्षाचालकांनी आधीच चक्काजाम आंदोलनाबाबत जाहीर केले असल्याने अनेकांनी घरी राहणेच पसंत करत कामाला दांडी मारली़ विद्यार्थी राहिले गैरहजरविवेकानंद प्रतिष्ठान संचलित विवेकानंद इंग्लिश स्कूल, शानबाग, पलोड शाळांमध्ये विद्याथ्र्याची वाहतूक करणारे वाहनधारक चक्काजाम आंदोलनात सहभागी झाले नाही़ या व्यतिरिक्त सर्व शाळकरी वाहतूक करणारे सुमारे 1 हजारावर चालक आंदोलनात सहभागी झाले होत़े आंदोलनाबाबत आधीच माहिती असल्याने त्रास नको म्हणून अनेकांनी पाल्यांना घरीच ठेवल़े रिक्षा अडवून दादागिरीचक्काजाम आंदोलनाला शहरात गालबोट लागले. नेहरु चौकात रात्री आठ वाजता दोन रिक्षांच्या काचा फोडण्यात आल्या. तर येणा:या जाणा:या रिक्षा अडवून त्यातील प्रवाशी उतरविण्यात येत होते. सोमवारी रात्री 12 ते दुस:या दिवशी रात्री 12 असे 24 तास रिक्षा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. रात्री आठ वाजता दोन रिक्षांची तोडफोड झाल्याची माहिती मिळताच मोठी गर्दी झाली होती. रिक्षा चालकांचे प्रशासनास निवेदनप्रवासी मालवाहतूकदार संघटना संयुक्त कृती समितीचे पदाधिकारी व रिक्षा चालक दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र आले होते. जिल्हाध्यक्ष दिलीप सपकाळे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी निदर्शने करण्यात आली. जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांना निवेदन दिले. मोटर वाहन विषयक शुल्क वाढीचा निर्णय मागे घ्यावा व बेसुमार शुल्क वाढ रद्द करावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी त्यांच्या समवेत ट्रान्सपोर्ट असो.चे पदाधिकारी पप्पू बग्गा तसेच मुकुंद सपकाळे, रज्जाक खान, मुकेश बेदमुथा, चंदु शर्मा, भरत वाघ, सुनील जाधव, शांताराम अहिरे, पोपट ढोबळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. आमदार सुरेश भोळे यांनी रिक्षाचालकांची भेट घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. तसेच मार्गदर्शन केले.
रिक्षा बंदमुळे विद्याथ्र्याची शाळेला दांडी
By admin | Published: February 01, 2017 12:21 AM