तीन वेगवेगळ्य़ा घटनेत दोन ठार : रेल्वेतून पडून महिला जखमीब:हाणपूर (म.प्र.), दि. 8 - जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जण ठार तर एक महिला गंभीर जखमी झाली. प्राप्त माहितीनुसार पहिली घटना उपनगर लालबाग रेल्वे स्टेशन पासून दोन कि.मी. अंतरावरील सिंगल मारुती हनुमान मदिराजवळील गेट क्रमांक 437 नजीक अनोळखी मृतदेह अमृतसर दादर एक्सप्रेसच्या चालकाला दिसला. त्याच्या माहितीवरून रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चौकशी करुन सोशल मीडियाचा वापर करुन स्थानिक ग्रुपवर मृतदेहचे छायाचित्र टाकले. काही तासातच मयताची ओळख पटली व त्याचे नाव फरीद अहमद सईद अहमद (वय 50) रा. हरीरपुरा, ब:हाणपूर असे असल्याचे निष्पन्न झाले. पोलीस सूत्रांनी सांगितले की, शुक्रवारी दुपारी विशेष नमाज झाल्यानंतर फरीद अहमद बेपत्ता झाले होते. रेल्वे पोलिसांनी नोंद करुन चौकशी सुरू केली आहे. दुस:या घटनेत नेपानगर तालुक्यातील सुकता गावात रात्री 7 वाजता प्रकाश प्रताप भील (वय 30) रा. सुकता यांनी कीटक नाशक सेवन केल्याने त्यांचा मृत्यू झाला. तिसरी घटना उपनगर लालबाग रेल्वे स्थानकावर रेल्वेतील प्रवासी महाबलेश्वरी देवी (वय 50) रा. गोरखपूर (उत्तर प्रदेश) ही महिला कुशीनगर एक्सप्रेमधून पाणी पिण्यासाठी खाली उतरली. त्यादरम्यान गाडी सुरू झाली व त्यात चढण्याच्या प्रयत्नाच ती खाली पडून गंभीर जखमी झाली.
सोशल मीडियामुळे पटली मयताची ओळख
By admin | Published: April 08, 2017 4:48 PM