धरणगाव- ११ रोजी रात्री अंजनी मध्यम प्रकल्प भरल्याने धरणाला धोका पोहचू नये यासाठी नदी पात्रालगत गावांना कुठलीही पूर्व सूचना न देता प्रशासनाने अचानक धरणाचे दोन दरवाजे उघडल्याने धरणगाव तालुक्यातील अंजनी नदी पात्रालगत असलेल्या बहुतांशी गावात पाणी शिरल्याने नागरिकांची झोप उडाली होती. कल्याने होळ बु., पिप्री खुर्द या दोन गावामध्ये अधिक पाणी शिरले होते. त्यामुळे पिंप्री खूर्द येथील १५ घरांमध्ये पूराचे पाणी घुसल्याने त्यांना ग्रामपंचायतने आसरा दिला होता. तर चार घरे वाहून गेली. १३ रोजी पुराचे पाणी पाणी ओसरले आहे११ रोजी एरंडोल तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने अंजनी धरण अदमासे ८० टक्के भरले आहे. प्रशासनाने मात्र पात्रा लगत गावांना कुठलीही पूर्व सूचना न देता धरणाचे पाणी सोडल्याने अंजनी नदीरा महापूर सदृष्य परिस्थिती निर्माण झाली होती. अंजनी नदी पाञालगत असलेल्या कल्याणे होळ, बु., पिंप्री खुर्द ,भोद खुर्द , भोद बु., चावलखेडा ,पिंपळेसिम , वाघळूद खुर्द , सतखेडा, सोनवद बु. या गावांना पाण्याने वेढा दिला होता.जर पाणी जास्त सोडले गेले असते तर कदाचित दुर्घटना घडण्यास धरण कारणीभूत ठरले असते.धरणातून सोडलेल्या या पाण्यामुळे पिंप्री खुर्द येथील १५ घरामध्ये पाणी घुसल्याने या लोकांना ग्रामपंचायत मध्ये आणण्यात आले होते.तर गावठाण अतिक्रमण मधील ४ घरे पडली. कल्याणे होळ बु. येथे पहाटे ४ वा. पाण्याने वेढा दिला होता.त्यात मंगल भिल याचे घर पडले.भोद बु.येथे गावाच्या वाटर सप्लाय पाण्यात गेला होता.तर भोद खुर्द ची स्मशान भूमी वाहून गेली. चावलखेडा येथील शाळेत पाणी घुसले होते. सतखेडा येथे वाटर सप्लाय व दोन बोरवेल पाण्यात गेले होते.तसेच महिलांचे शौचालय व गुरांचे हौद पाण्यात बुडाले होते.सोनवद बु.येथील बाजारपेठ ११ च्या रात्री पाण्यात होती.वाघळूद खूर्द च्या ग्रामपंचायत मध्ये पाणी शिरले होते.पाणी पुरवठा करणारी विहीर तुटली.पिंपळेसिम येथील वाटरसप्लायही पाण्यात होता.आज मात्र पाणी ओसरल्याने लोकांची भिती कमी झाली आहे.प्रशासनाकडून आवाहनअंजनी मध्यम प्रकल्प सुमारे ८० टक्के भरल्यान कधीही धरणातूनपाणी सोडले जाण्याची शक्यता आहे.तरी नदी काठावरील लोकांनी सावधानता बाळगावीअसे आवाहन तहसिलदार मिलींद कुलथे , बीडीओ एस.बी.कुडचे यांनी केले आहे.
अंजानी धरणाचे दोन दरवाजे अचानक उघडल्याने नदी पात्रालगतच्या गांवामध्य झाले होते पाणीच पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2019 8:19 PM