भुसावळ, जि,जळाव : अमृतसरकडून नांदेडकडे जाणाऱ्या सचखंड एक्सप्रेसला शौचालय असुविधेमुळे प्रवाशांनी ताठर भूमिका घेत जोपर्यंत साफसफाई होणार नाही गाडी हलू देणार नाही याकारणाने सचखंड एक्सप्रेला भुसावळ स्थानकावर तब्बल अडीच तासाचा खोळंबा झाला. त्यामुळे इतर पाच गाड्यांना गाड्यांंना २० मिनिटे दीड तासाच्या विलंबाने सोडावे लागले.साफसफाई, स्वच्छता, सुरक्षितता यावर रेल्वे प्रशासन कोट्यवधीचे खर्च करत असून मोठे दावे करत असते. मात्र प्रत्यक्षात फक्त या गप्पा हवेतील आहे, असा अनुभव सचखंड एक्सप्रेसच्या निमित्ताने दिसून आला. गाडी क्रमांक १२७१६ अमृतसर-नांदेड सचखंड एक्सप्रेसच्या कोच क्रमांक ए/१, बी/१ ते बी/६ कोचमध्ये बायो टॉयलेट पूर्णत: भरल्यामुळे सकाळच्या वेळेस शौचास जाण्यासाठी प्रवासासाठी रेल्वेतील सुविधेसाठी हजारो रुपये मोजूनसुद्धा सुविधा मिळत नाही. यामुळे प्रवाशांचा मोठा संताप झाला व जोपर्यंत डब्यातील शौचालयाची साफसफाई होत नाही तोपर्यंत गाडीला पुढे हलू द्यायचे नाही, अशी भूमिका प्रवाशांनी घेतली. सकाळी ६:४५ वाजून मिनिटांनी फलाट क्रमांक ३ वर आलेली गाडी ७:५६, ८:३५ व ८:४५ गाडीला तीन वेळा सोडण्याचा प्रयत्न केला असता प्रवाशांनी आक्रमक पवित्रा घेत जोपर्यंत साफसफाई होत नाही गाडी पुढे जाणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली. शेवटी स्वच्छता झाल्यानंतर ९:१० मिनिटांनी सुमारे अडीच तासाच्या विलंबाने गाडी नांदेड कडे मार्गस्थ झाली.दरम्यान, सचखंड एक्सप्रेस या घटनेमुळे घटनेचा परिणाम पाच गाड्यांवर दिसून आला. गाडी क्रमांक ५९०७६ भुसावल -सुरत पॅसेंजर ही निर्धारित वेळेपेक्षा १ तास २० मिनिटांनी, गाडी क्रमांक १२६५६ नवजीवन एक्सप्रेसही निर्धारित वेळेपेक्षा वीस मिनिटाने, गाडी क्रमांक १२१५२ समराष्ट्र एक्सप्रेस ही २५ मिनिटांनी, गाडी क्रमांक ५११५८ इटारसी-भुसावळ पॅसेंजर ही एक तास २० मिनिटाने भुसावळ रेल्वे स्थानकावर उशिराने आली.दरम्यान, रेल्वे प्रशासन स्वच्छतेविषयी गांभिर्याने लक्ष घालावे व नागरिकांना होणाºया असुविधा दूर कराव्यात, अशी अपेक्षा जनसामान्य आतून व्यक्त करण्यात येत आहे. एरवी चुकून पॅसेंजर ऐवजी एक्सप्रेस गाडीत बसले व तिकिट् राहून गेल्यास दंड करण्यास क्षणाचाही विलंब न करणारे रेल्वे प्रशासन मात्र सुविधांमध्ये नापास झाल्याचा आरोप होत आहे.
शौचालय असुविधेमुळे सचखंड एक्सप्रेस तब्बल अडीच तास उशिराने रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 1:40 AM
सचखंड एक्सप्रेसला शौचालय असुविधेमुळे प्रवाशांनी ताठर भूमिका घेत जोपर्यंत साफसफाई होणार नाही गाडी हलू देणार नाही याकारणाने सचखंड एक्सप्रेला भुसावळ स्थानकावर तब्बल अडीच तासाचा खोळंबा झाला.
ठळक मुद्देपाच गाड्यांवर परिणामरेल्वे प्रशासनाच्या हवेत गप्पासुविधांची मात्र वानवा