अमळनेर : तालुक्यात १९ रोजी झालेल्या गारपीट, वादळी पावसामुळे शिरुड , फापोरे , बिलखेडे व कन्हेरे परिसरातील ६२ घरांवरील पत्रे उडाली. २ शाळांचे छत उडून व ५० झाडे उन्मळून पडली. यात सुमारे १६ लाखांचे नुकसान झाले असल्याचे प्राथमिक पाहणीत निदर्शनास आले आहे. दरम्यान, या आपत्तीत सुदैवाने जीवितहानी टळली.१९ रोजी सायंकाळी ७ ते ८ वाजेच्या सुमारास वादळी पावसाला सुरुवात झाली. दक्षिण भागात काही प्रमाणात गारपीट झाली. कान्हेरे येथे सुमारे ३५ झाडे उन्मळून पडली. वीज तारा व लोखंडी खांब देखील तुटले आहेत. त्यामुळे वीज पुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे.फापोरे बु. येथे अनेकांच्या घरांच्या छताचे पत्रे उडाली आहेत.त्यामुळे कुटुंब उघड्यावर आले आहेत. यासह इतर १७ जणांचे गायीचे गोठे व चाऱ्यांचे कोठे यांचे किरकोळ नुकसान झाले आहे.स्वस्त धान्य दुकानावर झाड पडून दुकानाचे नुकसान झाले आहे.कन्हेरे येथील जि.प. प्राथमिक शाळेचे कौलारू छप्पर उडून सुमारे अडीच लाखांचे तर फापोरे खु. येथील शाळेच्या खोल्यांवरील पत्रे उडून दीड लाखाचे नुकसान झाले आहे.शिरुड येथील अनेकांच्या घरांचे छत उडाल्याने ही कुटुंब उघड्यावर पडली आहेत. भास्कर राजाराम पाटील यांच्या ट्रॅक्टरवर झाड पडल्याने ट्रॅक्टर दाबले गेले. ३० घरांचे किरकोळ नुकसान झाले.
अमळनेर तालुक्यात वादळी पावसामुळे ६२ घरांचे छत उडाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 7:36 PM
अमळनेर तालुक्यात १९ रोजी झालेल्या गारपीट, वादळी पावसामुळे शिरुड , फापोरे , बिलखेडे व कन्हेरे परिसरातील ६२ घरांवरील पत्रे उडाली.
ठळक मुद्देअमळनेर तालुक्यातील अनेक गावांमधील झाडे पडलीशिरुड, फापोरे,कन्हेरे, बिलखेड परिसरात गारपीटफापोरे येथील जिल्हा परिषद शाळेवरील पत्रे उडाली