शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar On Sharad Pawar : "मी जी राजकीय भूमिका घेतली ती साहेबांना सांगूनच, आधी हो म्हणाले नंतर..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
2
Breaking: खळबळजनक! दहशतवाद्यांकडून दोन जवानांचे अपहरण; पैकी एक तावडीतून सुटला
3
साईबाबा संस्थानला गुप्त दानावर कर द्यावा लागणार? हायकोर्टाने महत्वाचा निर्णय घेतला
4
राम रहीमला ६ वेळा पॅरोल देणाऱ्या माजी पोलीस अधिकाऱ्याचा विजय; भाजपमध्ये केला होता प्रवेश
5
"जिंकलेल्या डावाचे पराभवात रूपांतर करायचे काँग्रेसकडून शिकावे"; हरयाणा निकालावरुन ठाकरे गटाचा निशाणा
6
हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?
7
आजचे राशीभविष्य ९ ऑक्टोबर २०२४; प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल
8
हरयाणात घडले तेच महाराष्ट्रातही घडणार; भाजपच्या जल्लोष सभेत देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
9
अखेर ठरले... अजित पवार बारामतीतूनच लढणार; प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली उमेदवारी
10
जम्मू-काश्मीरमध्ये 'इंडिया', ओमर अब्दुल्ला होणार मुख्यमंत्री; आपनेही खाते उघडले
11
हरयाणात भाजपची हॅट्ट्रिक; काँग्रेसच्या पाच जागा वाढल्या, पण बहुमताची हुलकावणी
12
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचे काँग्रेस, शरद पवार गटाला आवाहन
13
एक्झिट पोल पडले तोंडावर; भाजपच्या जागांबाबत बहुतांश अंदाज फसले, निकालांबाबत होती उत्सुकता
14
ओमर हेच मुख्यमंत्री, वाटेकरी कुणीच नाही; फारूख अब्दुल्लांनी केले जाहीर, काँग्रेसचे ६ विजयी
15
घोळ सरेना, नाव ठरेना, अध्यक्ष मिळेना! शर्यतीत अनेक दिग्गज; पण, शिक्कामोर्तब कधी?
16
०.८५ टक्के कमी मते अन् गमावल्या ११ जागा; भाजप-काँग्रेसच्या मतांची टक्केवारी जवळपास सारखीच
17
जम्मू-काश्मीर विधानसभा निकालात ‘इंडिया’ने मारली बाजी, तरी भाजप ठरला बाजीगर
18
हरयाणामध्ये भाजप जिंकण्यामागचे गणित काय? काँग्रेसच्या हातात असलेला विजय हिसकावला
19
मागासवर्गीय मतदारांनी काँग्रेसकडे फिरविली पाठ; हरयाणात जाट-बिगर जाट मतांचे ध्रुवीकरण
20
काँग्रेसच्या मनोबलावर परिणाम होणार नाही; हरयाणा निकालावर रमेश चेन्नीथलांचे मत

वडजीसह सहा गावांचा पाणीपुरवठा धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 6:42 PM

गिरणेतून बेसुमार वाळू उपसा : पाण्याची पातळी खालावली

वडजी, ता. भडगाव : परिसरातील गिरणा पात्रातील वाळू उपशाने पाण्याची पातळी खालवत असून वडजीसह परिसराती सहा गावांचा पाणीपुरवठा यामुळे धोक्यात आला आहे.गेल्या काही वर्षापासून पावसाअभावी गिरणा पट्टयात पाणीटंचाईचे सावट दिवसेंदिवस गडद होत असतांना यातच भर म्हणून वडजी, वाक व वडधे येथील गिरणा पात्रात बिनधास्त वाळू उपसा सुरू असल्याने गिरणा धरणातून सुटणारे आवर्तनातील पाणी वाळू अभावी जमीनीत न जिरता वाहून जाते. त्यामुळे वडजी, रोकडाफार्म, वडगाव -नालबंदी, रूपनगर, पळासखेडा, महिंदळे या गावांच्या पाणीपुरवठा करणाऱ्या विहीरीत लगेचच पाण्याचा ठणठणाट होत आहे.गेल्या काही वर्षापासून वाक व वडधे गावांच्या हद्दीतील गिरणा पात्रातील वाळू मोठया प्रमाणात उपसली गेली आहे मात्र वडजी गावाच्या हद्दीत वडजी ग्रा.पं. व नागरिकांनी भविष्यात पाणीटंचाई होणार नाही यासाठी मोठ्या प्रमाणावर वाळू राखून ठेवली होती. यामुळे वडजी, वडगाव - नालबंदी, पळासखेडा, माहिंदळे या ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा करणाºया विहिरींना गिरणा धरणातून सोडलेल्या आवर्तनानंतरही पुढचे आवर्तनापर्यंन्त बºयापैकी पाणी टिकून राहत असे. वाक व वडधे गावांच्या हद्दीतील नदीपात्रातील वाळू संपली असल्याने अवैद्य वाळूउपसा करणाऱ्यांचा मोर्चा आता वडजी हद्दीच्या नदीपात्रात वळला असुन हजारो ब्रास वाळू रात्रीचा फायदा उठवत नेली. १०ते १२ फुटापर्यंत वाळूचा उपसा झाल्याचे दिसून येत आहे.यामुळे पाणीपुरवठा करणाºया विहिरीनी तळ गाठला आहे. तर गिरणा नदी भर पावसाळ्यात कोरडी झाल्याने साधे डबके देखील गिरणेला नसल्याने भर पावसाळ्यात पाणीटंचाईचे संकट या गावापुढे आ वासून उभे आहे.महसूल विभागाचे दुर्लक्षअशाच प्रकारे सतत वाळूउपसा होत गेला तर लवकरच या सहा-सात गावांना सततच पाणीटंचाईच्या भीषण संकटाला समोर जावे लागेल. हजारो ब्रॉस वाळू उपसा होवून देखील महसुल विभाग सर्व अलबेल असल्याचे भासवत आहे. १० फुट खोलीपर्यंत मोठमोठे खड्डे पाडून गिरणा नदीचे वस्त्रहरण होत आहे. मात्र प्रशासनातर्फे ठोस अशा काही उपाययोजना होत नसल्याचे दिसून येते. एखाद वेळेसच थातूरमातूर क ारवाई होते. याची दखल घेवून लोकप्रतिनिधींनी हा प्रश्न उचलावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.