जळगाव : केंद्रातील व राज्यातील भाजप सरकारने केलेल्या कामामुळे पुन्हा महायुतीचे उमेदवार विजयी होतील तर जनतेला बदल हवा असल्याने आघाडीचे उमेदवार विजयी होतील, असा दावा राजकीय पक्षांच्या जिल्हाध्यक्षांनी केला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कामामुळे तसेच संघटनात्मक कामामुळे रावेर मतदार संघात रक्षा खडसे दोन ते अडीच लाख तर जळगाव मतदार संघात आमदार उन्मेष पाटील हे दोन लाखाच्या मताधिक्याने विजयी होतील.- उदय वाघ, जिल्हाध्यक्ष, भाजप.आमदार उन्मेष पाटील यांना प्रत्येक विधानसभा मतदार संघातून ५ ते १० हजाराचे मताधिक्य मिळून ५० हजाराच्या मतांनी ते विजयी होतील.- गुलाबराव वाघ, जिल्हाध्यक्ष,शिवसेनाजनतेला बदल हवा असल्याने रावेर मतदार संघाच डॉ. उल्हास पाटील हे ३५ ते ४० हजाराच्या मताधिक्याने तर जळगाव मतदार संघात गुलाबराव देवकर हे ८० हजाराच्या मताधिक्याने विजयी होतील.- अॅड, संदीप पाटील, जिल्हाध्यक्ष, संदीप पाटील.सरकारच्या धोरणामुळे जनता त्रस्त असल्याने कोणत्याच आश्वासनाची पूर्तता न झाल्याने या वेळी आघाडीचे उमेदवार विजयी होती. यात जळगाव मतदार संघातून गुलाबराव देवकर हे एक लाखाच्या मतधिक्याने तर रावेर मतदार संघात डॉ. उल्हास पाटील हेदेखील मोठ्या मताधिक्याने विजयी होतील.- अॅड. रवींद्र पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस.
सरकारच्या कामामुळे युती तर बदल हवा असल्याने आघाडीचा उमेदवार विजयी होण्याचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 12:41 AM