मुक्ताईनगर, जि.जळगाव : तालुक्यातील कोथळी येथे पंधरा दिवसात दुसऱ्यांदा घरफोडी झाली असून, पवन विलास खडसे यांच्या घरातून सहा ग्रॅम सोने व सात हजार रुपये रोख असा ऐवज लुटून नेल्याची घटना १३ जूनला रात्री ११ ते १२ वाजेच्या दरम्यान घडली. दरम्यान, चोरट्यांमध्ये महिलेचा समावेश असून, पवन खडसे यांची पत्नी नम्रता यांना बेशुद्ध करुन चोरी करण्यात आली आहे.दरम्यान, रात्रीच गस्तीवरील पथक तसेच पोलीस हेडकॉन्स्टेबल माणिकराव निकम यांनी तातडीने पावले उचलत गुन्हा दाखल करून वरिष्ठांना कळल्याने जळगाव येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक गांगुर्डे यांनी श्वानपथकासह कोथळी येथे भेट देऊन घराची तपासणी केली असता घराच्या अवतीभोवती श्वान घुटमळत त्यांना आढळून आले. दरम्यान, मुक्ताईनगरचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली. बोदवडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील खरे, मुक्ताईनगर चे पोलीस उपनिरीक्षक अशोक उजगरे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करत तपासणी केली.कोथळी गावातील हनुमान मंदिराच्या मागे राहात असलेल्या पवन विलास नारखेडे यांच्या घरात १३ जूनच्या रात्री ११ ते १२ वाजेच्या दरम्यान अनोळखी महिला व चोरट्यांनी घरफोडी करत सहा ग्रॅम सोने आणि सात हजार रुपये रोख असा ऐवज लुटून नेला आहे.तक्रारदार पवन खडसे यांची पत्नी नम्रता यांनी रात्री ११ ते १२ वाजेच्या दरम्यान लघुशंकेसाठी बाहेर जाण्यासाठी दरवाजा उघडला असता त्याचवेळी अज्ञात महिलेने येऊन तोंडावर काहीतरी लावून गुंगीच्या औषधाने नम्रता खडसे यांना बेशुद्ध केले. यादरम्यान दरवाजा उघडा असल्याने संधीचा फायदा घेत अज्ञात चोरटी महिला आणि इतर चोरट्यांनी घरात घुसून कुलूप न लावलेल्या कपाटात ठेवलेले सहा ग्रॅम सोने आणि सात हजार रुपये रोख चोरून पोबारा केला. पोलीस पाटील संजय चौधरी यांनी रात्री उशिरा पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली. यानंतर तपास चक्रे फिरण्याच्या दृष्टिकोनातून सकाळीच लवकर श्वानपथक कोथळीत दाखल झाले होते.दरम्यान, सकाळी जळगाव येथील श्वानपथक कोथळी येथे येऊन घरामध्ये पाहणी केली. शिवाय पथकाने तपासणी केली. श्वानपथकाने कोणताही मार्ग दाखवल्याचे अजून पोलिसांनी स्पष्ट केलेले नाही.१५ दिवसात चोरीची दुसरी घटना१५ दिवसांपूर्वीच कोथळी गावातील विष्णू राणे व इतर दोन व्यक्तींच्या घरात चोरट्यांनी घरफोडी करत हातसफाई केलेली होती. १५ दिवसातच पवन खडसे यांच्या घरात दुसरी घरफोडी झाल्याने गावात भीतीचे वातावरण आहे. पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. लहानशा गावात १५ दिवसात दोनदा चोरीच्या घटना घडत असल्याने पोलीस गस्त वाढवण्याची मागणी याप्रसंगी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.
मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथे गुंगीचे औषध देवून घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 6:36 PM
मुक्ताईनगर , जि.जळगाव : तालुक्यातील कोथळी येथे पंधरा दिवसात दुसऱ्यांदा घरफोडी झाली असून, पवन विलास खडसे यांच्या घरातून सहा ...
ठळक मुद्देचोरट्यांममध्ये महिलेचा सहभाग सोन्याचे दागिने रोख लंपास