शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
6
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
9
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
10
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
12
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
13
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
14
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
15
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
16
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
17
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
18
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
19
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
20
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर

जळगावात सप्तसुरांनी उजळली दिवाळी पहाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2018 11:01 PM

हजारो दिव्यांच्या साक्षीने स्वरचैतन्याचा उत्सव

जळगाव : मिणमिणत्या पणत्या प्रज्ज्वालीत करता करता पहाटेच उजेडाची अनुभूती, उगवता नारायण जस जसा वर सरकत प्रकाश किरणांचा वर्षाव करत सारे तेज भूमंडळी उधळतो, समस्त मानवास आनंद देत जातो तेच तेज, तेच चैतन्य तोच आनंद ‘दिवाळी पहाट’ने रसिकांना दिला. गणरायाच्या प्रार्थनेने सुरुवात होऊन कार्यक्रमाला मिळत गेलेली उंची अगदी शेवटच्या ‘गोविंद बोलो हरि गोपाल बोलो’पर्यंत गायक कलावंतांनी टिकवून ठेवत रसिकांची दाद मिळविली.दिवाळीचा आनंद द्विगुणित करता यावा यासाठी लोकमत सखी मंच, बाल विकास मंच व दिशा अकॅडमी व सातपुडा इन्फोटेक प्रा.लि.तर्फे मंगळवारी दिवाळी पहाट या कार्यक्रमाचे आयोजित काव्यरत्नावली चौकात करण्यात आले होते. हजारो पणत्या सखींच्याहस्ते प्रज्वालित करण्यात आल्या.दीपोत्सवासह अमोल पाळेकर प्रस्तुत मराठी-हिंदीतील दिवाळी व भक्तीगीतांची ही सुमधूर मैफल गायक कलावंत आनंद अत्रे, अश्विनी जोशी यांनी बहारदार गीते सादर करून रसिकांची दाद मिळविली. यात जय जय रामकृष्ण हरि, ओंकार स्वरुपा, श्रीरामंचद्र कृपाळू, देवाचिये द्वारी, माझी रेणुका माऊली, बाजे रे मुरलीया बाजे, भाग्यदा लक्ष्मी बारम्मा, साईबाबांच्या लिलांवर आधारीत दीपावली मनाए सुहानी मेरे साई के हाथों मे जादु का पानी.. अशा एकाहून एक हिंदी, मराठी गीत, भक्तीगीतांना गीतांना रसिकांनी भरभरून दाद दिली. या गोविंद बोलो हरि गोपाल बोलो या श्रीकृष्णाच्या आराधनेने कार्यक्रमाची सांगता झाली.‘बाजे रे मुरलीया बाजे’ला प्रचंड दादआनंद अत्रे व अश्विनी जोशी यांनी सादर केलेल्या या ‘बाजे रे मुरलीया बाजे’ गाण्याला मोठी दाद मिळाली. रागेश्री धुमाळ, आदित्य कुलकर्णी, स्वरांजय धुमाळ, मनोज गुरव यांनी साथसंगत केली. तर श्रीपाद कोतवाल यांनी उत्कृष्ट निवेदन केले.बासरी वादनाने ‘दिवाळी पहाट’मध्ये भरले रंगस्वरचैतन्य दिवाळी पहाट कार्यक्रमादरम्यान मनोज गुरव यांच्या बासरी वादनाने स्वरचैतन्यात रंग भरला. सलग सहा मिनिटे केलेल्या बासरी वादनाने रसिकांची दाद मिळविली.सूर्यनारायणाच्या साक्षीने सुरांची बरसातकाव्यरत्नावली चौकात पहाटे रसिकांना सहपरिवार फक्त एक पणती घेऊन सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार प्रत्येक जण सहकुटुंब एक एक पणती घेऊन ती प्रज्ज्वालीत करत कार्यक्रमात सहभागी होत होते. हळू हळू रसिकांच्या उपस्थितीने हा परिसर पूर्ण भरून गेला आणि संगीताची ही मैफल रंगत गेली.या वेळी ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी, वरिष्ठ महाव्यवस्थापक प्रविण चोपडा यांच्यासह शहरवासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.