धरणगाव, जि.जळगाव : शहरालगत शामखेडा फाट्यावर पोलिसांनी जुगारावर धाड टाकली. त्यात सहा जणांना ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, जुगार खेळणारे पळण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांना पकडताना धावपळीत तीन पोलीस कर्मचारी खाली पडले. त्यात सहायक पोलीस निरीक्षक पवन देसले जखमी झाले. २३ रोजी मध्यरात्री ही घटना घडली.धरगाव शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या शामखेडा फाट्यावर पत्ता, जुगार खेळला जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्याआधारे पोलिसांनी २३ रोजी मध्यरात्री धाड टाकली. पोलीस आल्याचे लक्षात येताच संशयितांनी घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांना पकडताना धावपळीत तीन पोलीस खाली पडले. त्यात सहायक पोलीस निरीक्षक पवन पी.देसले जखमी झाले. त्यांच्या हाताला पत्रा लागला आहे.संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यात चुडामण पाटील (वय ४७, रा.भोणे, ता.धरणगाव), गणेश चौधरी (वय ३९), जियाराम माळी (वय ४०), नरेंद्र चौधरी (वय ३८) (तिन्ही रा.धरणगाव), , अनिल पाटील (वय ३५) व अमिल पाटील (वय ३२़) (दोन्ही रा.कंडारी, ता.अमळनेर)त्यांच्याकडून सहा मोटारसायकली तसेच पत्ता, जुगाराचे साहित्य व दोन हजार ४०५ रुपये रोख रक्कम असा मिळून एक लाख १२ हजार ४०५ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.सपोनि देसले यांच्यासह पो.काँ.पंकज पाटील व पो.काँ.कैलास पाटील यांनी ही कारवाई केली.
धरणगावजवळ जुगारावर धाड : जुगाऱ्यांना पकडताना सपोनि जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2019 5:20 PM
शामखेडा फाट्यावर पोलिसांनी जुगारावर धाड टाकली. त्यात सहा जणांना ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, जुगार खेळणारे पळण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांना पकडताना धावपळीत तीन पोलीस कर्मचारी खाली पडले. त्यात सहायक पोलीस निरीक्षक पवन देसले जखमी झाले.
ठळक मुद्देसहा जण ताब्यात जुगाऱ्यांना पकडताना सपोनि जखमीसहा मोटारसायकली जप्त