जळगाव : खड्डयामुळे निष्पाप लोकांचे बळी जात असतानाच आता अवजड वाहनांचाही मुद्दा ऐरणीवर आला आहे. शहरात अवजड वाहनांसाठी वेळमर्यादा व रस्ते निश्चित केलेले असताना या साऱ्यांचे उल्लंघन करुन शहरात वाळूचे डंपर, ट्रॅक्टर, ट्रक, सिमेंट वाहनारे वाहने बिनधास्त वावरत आहेत. गेल्या दोन महिन्यात शहरात अपघातात ठार झालेल्या व्यक्ती या अवजड वाहनांखालीच झालेल्या आहेत.रिंग रोड ते पिंप्राळा रेल्वे गेटरिंग रोड ते पिंप्राळा रेल्वे गेट या मार्गावर सकाळी ७ ते १०.३० व दुपारी ४ ते रात्री ९ या वेळेत अवजड वाहनांना बंदी आहे. सकाळी १०.३० ते दुपारी ४ या वेळेत वाहनांना परवानगी आहे.आकाशवाणी चौकातील दत्त मंदिर, पंचम हॉस्पिटल, बहिणाबाई उद्यान या मार्गावर अवजड वाहनांना २४ तास बंदी आहे. हा मार्ग वनवे आहे. पिंप्राळाकडून रिंगरोडकडे रात्री ९ ते सकाळी ७ वाजेपर्यंत अवजड वाहनांना परवानगी आहे.पिंप्राळा रेल्वे गेट ते शाहू नगर व गोविंदा रिक्षा थांबा या मार्गावर २४ तास बंदी आहे.अजिंठा चौक ते दाणाबाजार मार्ग बंदअजिंठा चौकाकडून गावात दाणाबाजाराकडे येण्यासाठी सकाळी १०.३० ते दुपारी ४ या वेळेत अवजड वाहनाना प्रवेश आहे, त्यानंतर व आधी प्रवेश बंदी आहे. रात्री ९ ते सकाळी ७ या वेळेतही अवजड वाहने शहरात येऊ शकतात. आकाशवाणी चौक ते बसस्थानक या मार्गावरही अवजड वाहनांना बंदी आहे.ट्रॅव्हल्सचीही घुसखोरीसकाळी व सायंकाळी शाळेच्या वेळा लक्षात घेता अपघात टाळण्यासाठी तत्कालिन पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी शहरात ट्रॅव्हल्सला बंदी घातली होती. त्याबाबत राज्य शासनाने अधीसूचनाही काढली होती. महामार्गावरुन अजिंठा चौकातूनच नेरी नाका थांब्यावर बसेला परवानगी दिली आहे.