भुसावळ, जि.जळगाव : अंतर्नाद प्रतिष्ठानने ‘एक दुर्वा समर्पणाची’ उपक्रम हाती घेतला आहे. भुसावळ तालुक्यातील मांडवेदिगर येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत रविवारी हा उपक्रम राबवण्यात आला. त्यात गरजू ८० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना शिक्षणाचा लळा लागण्यासाठी या शाळेचे रुपडे बदलवू, अशी ग्वाही मान्यवरांनी या कार्यक्रमात दिली.पंचायत समितीच्या सभापती प्रीती पाटील, उपसभापती वंदना उन्हाळे, प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे, प्रज्ञासूर्य प्रतिष्ठानचे सचिव प्रा. जतीन मेढे, ग. स. चे स्वीकृत संचालक योगेश इंगळे, जय गणेश फाउंडेशनचे सल्लागार गणेश फेगडे, परिस संस्थेचे सचिव जीवन महाजन, प्रभाकर नेहेते, मांडवेदिगरच्या सरपंच द्वारका जाधव, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष देशमुख पवार, मुख्याध्यापक संजय वंजारी, शिक्षक रवीतेज पढार यांची प्रमुख उपस्थिती लाभली.या मान्यवरांच्या हस्ते ८० विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या, पेन, पेन्सील, खोडरबर असे साहित्य वाटप करण्यात आले. अंतर्नादचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी उपक्रमाची माहिती दिली. ग्रामस्थ गोरलाल जाधव, गोपीचंद पवार, त्र्यंबक पवार, गणेश राठोड, अजय पवार, नेरचंद पवार, संजय राठोड, गोपाल पवार, ईश्वर पवार यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन राहुल भारंबे, प्रास्ताविक नूतन शिक्षक पतपेढीचे संचालक तथा प्रकल्पप्रमुख प्रदीप सोनवणे यांनी केले. आभार प्रकल्प समन्वयक अमितकुमार पाटील यांनी मानले.विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्यशैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहºयावर हास्याची लकेर उमटली. शहरी भागातील संस्थेने या मराठी शाळेत राबवलेल्या उपक्रमाचे ग्रामस्थांनी कौतुक केले. शाळेला जास्तीत जास्त सुविधा पुरवण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही सभापती प्रीती पाटील, प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे यांनी दिली. ज्ञानेश्वर घुले, प्रमोद पाटील, देव सरकटे, अमित चौधरी, भूषण झोपे, संदीप सपकाळे उपस्थित होते.
मांडवेदिगर येथे मराठी शाळेत ‘एक दुर्वा समर्पणाची’ उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 5:09 PM
भुसावळ , जि.जळगाव : अंतर्नाद प्रतिष्ठानने ‘एक दुर्वा समर्पणाची’ उपक्रम हाती घेतला आहे. भुसावळ तालुक्यातील मांडवेदिगर येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत रविवारी हा उपक्रम राबवण्यात आला. त्यात गरजू ८० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना शिक्षणाचा लळा लागण्यासाठी या शाळेचे रुपडे बदलवू, अशी ग्वाही मान्यवरांनी या कार्यक्रमात दिली.पंचायत समितीच्या ...
ठळक मुद्देविद्यार्थ्यांना वाटप केले शैक्षणिक साहित्यविद्यार्थ्यांना शिक्षणाचा लळा लागण्यासाठी शाळेचे रूपडे बदलवण्याची मान्यवरांची ग्वाही