बोदवड : परिवारासोबत कपडे धुण्यासाठी गेलेल्या शंतनू उर्फ भैया अनिल पोळ (वय १६) याचा बंधाºयात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी दुपारी दोनला नाडगाव, ता.बोदवड येथे घडली.मुक्ताईनगर रस्त्यावरील हिंगणा गावाजवळ वनशिवारात सिमेंट बांध आहे. या बंधाºयावर कपडे धुण्यासाठी शंतनू उर्फ भैया अनिल पोळ हा आपल्या कुटुंबासह गेलेला होता.कपडे धुणे झाल्यावर आई व सर्व मंडळी जेवण करायला झाडाखाली बसले. तेव्हा शंतनू बंधाºयाच्या ओट्यावरच गावातील काही तरुण पोहत असल्याचे पाहत बसला होता. त्यात त्याचा तोल गेला अथवा पाय सटकला आणि त्यातच तो पाण्यात पडला.त्याला पोहता येत नसल्याने खाली गाळात अडकला. ही बाब पोहणाºया तरुणांनी पाहिली व ते घाबरून गेले व पळाले.नंतर समोरून रानातून गुरे चारून घराकडे परतणाºया गुराख्यांनी जनावरे पाण्याजवळ आणली. तेव्हा त्यांना हा प्रकार लक्षात येताच पाण्यात उडी मारली व गाळातून शंतनूला बाहेर काढले.समोरच झाडाखाली बसलेल्या महिला व शंतनूच्या आईला आपलाच मुलगा असल्याचे समजले. त्यांनी त्याला बोदवड येथे खासगी दवाखान्यात आणले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.नाडगाव येथील शिवाजीनगरमधील रहिवासी अनिल पोळ यांचा एकुलता एक, चार बहिणीचा एकच भाऊ असलेला शंतनू उर्फ भैया अनिल पोळ याच्या मृत्यूने नाडगावावर शोककळा पसरली आहे.
नाडगाव येथे बंधाऱ्यात बुडून मुलाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2018 9:14 PM
बोदवड : परिवारासोबत कपडे धुण्यासाठी गेलेल्या शंतनू उर्फ भैया अनिल पोळ (वय १६) याचा बंधाºयात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी दुपारी दोनला नाडगाव, ता. बोदवड येथे घडली.मुक्ताईनगर रस्त्यावरील हिंगणा गावाजवळ वनशिवारात सिमेंट बांध आहे. या बंधाºयावर कपडे धुण्यासाठी शंतनू उर्फ भैया अनिल पोळ हा आपल्या कुटुंबासह गेलेला होता.कपडे धुणे ...
ठळक मुद्देघटनेनंतर शंतनूच्या घरासमोर नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले होते.चार बहिणींचा एकुलता एक भाऊ होतातो नाडगावातच इयत्ता दहावीत शिकत होता.