पाचोरा : शेतातील चाºयाच्या गोडाऊन वरील विद्युत तार अन्यत्र हलविण्यात आल्याची मोबदला रक्कम १० हजार रुपये ही शेतकºयाकडून लाच म्हणून स्विकारताना वीज वितरण कंपनीच्या विद्युत सहाय्यकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडल्याची घटना पाचोरा येथे आज सध्याकाळी ६ च्या सुमारास घडली.पिंप्री खुर्द प्रपा येथील तक्रारदार शेतकरी याने त्याच्या शेतातील गायीच्या चाºयाच्या गोडाऊन वरून गेलेली धोकादायक तार हलविण्यासाठी विद्युत सहाय्यक राहुल संतोष बेंडाळे वीज कार्यालय कार्यालय शिंदाड याने १० हजार रुपये लाचेची मागणी केली. ऐन दुष्काळी परिस्थितीत पैसे देणे शक्य नाही. व तार हलवण्याची जबाबदारी कंपनीची होती. यामुळे शेतकºयाने जळगाव लाच लुचपत कार्यालयात तक्रार केली.यावरून ६ रोजी संध्याकाळी ६ चे सुमारास पाचोरा येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून विद्युत सहायक राहुल संतोष बेंडाळे (वय २४) यास १० हजाराची लाच घेताना रंगेहाथ अटक केली.या प्रकरणी पोलिस उपअधीक्षक जी. एम. ठाकूर यांचे मार्गदर्शनखाली पोलीस निरीक्षक नीलेश लोधी, गणेश कदम, पोलीस नाईक मनोज जोशी, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत ठाकूर, प्रवीण पाटील, नासीर देशमुख, ईश्वर धनगरयांनी कामगिरी बजावली.
पाचोऱ्यात विद्युत सहायकास लाच घेताना रंगेहाथ अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2019 10:39 PM