हितेंद्र काळुंखे ।जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून डॉ. बी. एन. पाटील यांनी काही दिसांपूर्वीच कार्यभार स्विकारला आहे. या काही दिवसात जिल्हा परिषदेच्या कामकाजाचा त्यांनी घेतलेला आढावा तसेच पुढील नियोजन या विषयी जाणून घेण्यासाठी ‘लोकमत’ने त्यांच्याशी संवाद साधला.प्रश्न: जिल्हा परिषदेच्या कामकाजविषयी काय वाटते?उत्तर: कामकाज अधिक गतिमान व पारदर्शी करण्याची आवश्यकता वाटते. यासाठी लवकरात लवकर ई- आॅफीस प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे. यामुळे प्रत्येक कामकाजाची फाईल ही ई माध्यमातून तयार होवून फाईलचा प्रवास आदी माहिती हे संबंधिताना पाहणे सहज होईल. अर्थात कामाची गती आणि पारदर्शकताही वाढेल.प्रश्न: यापूर्वी अधिकारी आणि पदाधिकारी यांच्यातील वाद चव्हाट्यावर आले आहेत. अधिकारी हे पदाधिकाऱ्यांचे ऐकत नाही.परिणामी कामे रखडतात अशी तक्रार असते?उत्तर: अधिकारी आणि पदाधिकारी यांच्यात समन्वय असला तरच कारभार सुरळीत चालू शकतो. यादृष्टीने आपला समन्वय राखण्याचा नेहमीच प्रयत्न राहील.प्रश्न: नुकताच जिल्हा परिषदेचा १४ कोटीचा निधी परत गेला व गेल्या वर्षात कामांच्या नियोजनालाही उशीर झाला, यास जबाबदार कोण?उत्तर: परत गेलेला निधी हा काही वर्षामधला असून यापुढे कामांचे नियोजन वेळच्यावेळी करण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे. यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित राहील. माझ्याकडून विलंब होवू देणार नाही.प्रश्न :विविध योजना कशा राबविल्या जात आहेत ?उत्तर:शासनाच्या विविध योजना व दिलेले उद्दीष्ट हे पूर्ण केले जात आहे. आपणही पदभार स्विकारल्यानंतर याकडे विशेष लक्ष दिले आहे. गेल्या ४ वर्षात३२९७८ घरकुले मंजूर करण्यात आली.आजपर्यत २२६४८ घरकुलेपूर्णझालीत. मागील ६ महिन्यात विशेष पाठपुरावा करुन १२हजारपेक्षा अधिक घरे पूर्ण करण्यात आली.ग्रामीण भागातील ५७६३ कुटुंबांना स्वत:ची जागा नसल्याने गावठाण व शासकीय जागा घरकुलासाठी उपलब्ध करुन देण्यासाठी पंडीत दिनदयाल योजनेतून १,६३,७४३०० इतका खर्च करण्यात आला. दोन वर्षात १६६४३७ शौचालये पूर्ण करण्यात आली. यामुळे जिल्हा हगणदरीमुक्त झाला.ग्रामीण भागातील विविध अतिक्रमणे नियमित करण्याबाबत आदेश दिले होते.यानुसार १०,३३१ अतिक्रमणे नियमीत करण्यात आलीत. १०० टक्के काम पूर्ण करण्यात आले. याचबरोबर कर्मचारी व शिक्षकांसाठी एक नवे अॅप तयार केले जात आहे. -डॉ.बी. एन.पाटील
ई- आॅफीस प्रणाली कार्यान्वित करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 11:54 AM
जि.प.चे सीईओ डॉ.बी.एन. पाटील यांचा संकल्प
ठळक मुद्देसंडे स्पेशल मुलाखत