भुसावळ : महानगरपालिकांच्या धरतीवर भुसावळ शहरातही सुलभ शौचालयांची उभारणी करण्याची गरज निर्माण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील स्वच्छ भरत हे चित्र निर्माण करण्यासाठी अशा उपाय योजनांची गरज असल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, सुलभ शौचालयासारख्या योजना शहरात सुरू करण्यात आल्या तरच भुसावळ शहर सुंदर आणि हगणदारीमुक्त होईल, असेही मानले जात आहे.मध्यंतरी दोन-तीन दिवस पालिकेने हगणदारीमुक्तीसाठी तैनात केलेल्या गुड मॉर्निग पथकाकडून उघडय़ावर बसणा:या लोकांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. त्यानंतर त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याचे सूचित केले ही प्रक्रिया शासकीय म्हणून ठिक आहे. मात्र शहरातील वास्तव अगदीच भीषण आहे.शहरातील स्लम (झोपडपट्टी) भागात कोठेही चांगली स्वच्छता व भरपूर पाणी आणि प्रकाशाची सोय असलेले सार्वजनिक शौचालय नाही.ज्या ठिकाणी अशी शौचालय आहेत,त्यांचे या आधीच तीन-तेरा झाले आहेत.शहरात ज्या ज्या ठिकाणी सार्वजनिक शौचालय आहे.त्या ठिकाणची स्थिती अतिशय दयनीय आहे. अशा सार्वजनिक शौचालयांमध्ये नैसर्गिक विधीसाठी जाणे एक दिव्यच आहे, इतकी बिकट स्थिती आहे. त्यामुळे रहिवाशांना नाईलाजास्तव आपले नैसर्गिक विधी उघडय़ावर उरकून घ्यावे लागत असल्याची स्थिती आहे.उन्हाळ्यात वेगळे चित्रएप्रिल, मे या तीव्र उन्हाळ्याच्या महिन्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचीच भीषण टंचाई असते अशावेळी सार्वजनिक शौचालयांमध्ये वापरण्यासाठी पाणी आणणार कोठून असा प्रश्न लोकांना पडत आहे.दरम्यान, शहराप्रमाणे ग्रामीण भागातही सार्वजनिक शौचालयांची वाईट अवस्था आहे.ग्रामीण भागात पाणी टंचाईचा दरवर्षी गहन प्रश्न असतो त्यामुळे शौचालयात पाण्याचा वापर करणार कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या ठिकाणी सुलभ शौचालयांची गरजआठवडी बाजार व इतरही वेळी कायम गर्दी असलेला अष्टभुजा देवी परीसर, नाहाटा कॉलेज चौफुली जवळ, मरीमाता मंदिरा मागील परीसर, मुख्य बाजार वार्ड, खडका चौफुली, वरणगाव रोड, शिवाजगर परिसर, यावलनाका, जळगाव नाका, सरदार वल्लभभाई पटेल पुतळ्याजवळ, न्यायालयाच्या मागील परिसर धम्मनगर, मामाजी टॉकीज परिसरात महात्मा फुलेनगर, तालुका पोलीस ठाण्या जवळ गौतमनगर, पंचशीलनगर, दीनदयालनगर, इंदिरा नगर, अशोक नगर, तापीनदीकडील भागात राहुलनगर, टेक्नीकल हायस्कूल जवळ, प्रभाकर हॉल जवळ या शिवाय पंधरा बंगला, सुभाष पोलीस चौकी परीसर, पापानगर, खडकारोड भाग, गडकरी नगर परिसर, महामार्ग आदी ठिकाणी सुलभ शौचालय उभरले जाऊ शकतील.त्यासाठी नगरपालिकेने शासनाकडे प्रस्ताव देऊन पाठपुरावा करणे गरजेचे आहे. असे झाल्यास सफाई कामगारांचा रोजगाराचाही प्रश्न काही प्रमाणात सोडविला जाऊन पालिकेलाही त्यातून उत्पन्न मिळेल.(प्रतिनिधी)सध्या जि.प.निवडणुकींची आचार संहिता सुरू आहे.ती संपली की, कामांना सुरुवात करायची आहे. सुलभ शौचालय उभारणीसाठी काय करता येईल याचाही विचार करण्यात येणार आहे.सुलभ शौचालयात रोज पैसे देऊन लोकांना जाणे परवडेल का याचाही विचार करावा लागेल. त्या आधी शहराची स्वच्छता व शहरवासीयांचे आरोग्य निर्मळ राहण्यासाठी ज्या ठिकाणी आता सार्वजनिक शौचालय आहेत त्यांची देखभाल करण्याचा मक्ता सफाई कर्मचा:यांना देण्याचा विचार सुरु आहे.अशा शौचालयांच्या वापरासाठी घरपट्टी व पाणी पट्टीच्या बिलांमध्ये वर्षाला 200 रुपये आकारुन हा प्रश्न सोडविता येईल काय यासाठी प्रय} करण्याचा विचार सुरू आहे.24 प्रभागांची रचना4शहराचे एकूण 24 प्रभाग पाडण्यात आले आहे. प्रशासनाच्या कामाच्या सोयींसाठी ही रचना करण्यात आली आहे. 24 प्रभागांमधून प्रत्येकी दोन असे 48 नगरसेवक पालिका सभागृहात आहेत.यात यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्षांसह 49 लोकप्रतिनिधी आहेत.त्यात आणखी पाच सदस्य शासन स्वीकृत आहेत.त्यांच्या मदतीला मुख्याधिकारी आहेत.रेल्वे सारखी सुविधा हवी4भुसावळ रेल्वे स्थानकाचे द्वितीयश्रेणी प्रतीक्षालय, रेल्वे फलाटांवरील शौचालय यांच्या सारखी रचना असलेले शौचालय नगरपालिका प्रशासनाने उभारल्या शिवाय भुसावळ शहर आणि ग्रामीण भाग हगणदरीमुक्त होणार नसल्याचे वास्तव आहे.यासाठी पालिका प्रशासनाने मुंबई, पुणे,नाशिक येथील सुलभ शौचालया प्रमाणे उपक्रम राबवावा.
शहरात सुलभ शौचालयांची गरज..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2017 12:17 AM