धानोरा, ता.चोपडा : येथील झि.तो.म. माध्यमिक व ना.भा. पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात पर्यावरणपूरक शाडू मातीपासून गणपती मूर्ती बनविणाचा उपक्रम राबविण्यात आला.विद्यालयातील राष्ट्रीय हरितसेना व पर्यावरण विभागाच्या वतीने प्राचार्य के.एन.जमादार यांच्या मार्गदर्शनात हरितसेना शिक्षक देविदास महाजन शाळेत हा उपक्रम राबवित आहेत.एकही प्लास्टर आॅफ पॅरिसची मूर्ती विकत न घेता शाडू मातीचीच बसविण्याचा संकल्प विद्यार्थ्यांकड़ून करून घेतला. रविंद्र नवल कोळी व योगेश भगवान कुंभार यांनी अत्यंत सोप्या पद्धतीने नैसर्गिक टाकाऊ साहित्य व शाडू मातीचा उपयोग करून विद्यार्थ्यांना मर्तीला सुबक आकार देण्याचे शिकविले. संस्थेचे अध्यक्ष बी.एस.महाजन, शाळेचे चेअरमन सुखदेवराव पाटील, चुड़ामण पाटील, वामनराव महाजन, प्रदीप महाजन, शिक्षक, पालक आदींनी उपक्रमाचे कौतुक केले.