ठळक मुद्दे विद्यार्थ्यांनी बनविल्या शाडू मातीपासून मूर्तीविद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
पातोंडा, ता.चाळीसगाव, जि.जळगाव : येथील माध्यमिक विद्यालयात इको फ्रेण्डली गणेश मूर्ती बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली. यात विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्त सहभाग घेत शाडूच्या मातीपासून मूर्ती बनवल्या.पर्यावरणाला प्रदूषणापासून वाचवण्यासाठी मुख्याध्यापक ए.ई.चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली कलाशिक्षक पी.व्ही.पाटील यांनी शाडू मातीच्या गणेश मूर्ती तयार करून दाखवली. पीओपीचे दुष्परिणाम लक्षात घेऊन पर्यावरणाला प्रदूषणापासून वाचवता येईल, असे आवाहन चौधरी यांनी केले.शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.