ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 05- मुलांमध्ये वाढणारा अभ्यासाचा ताण आणि त्यावर पुस्तकांनीच करता येणारी मात, या सर्वामध्ये सोशल मीडियामुळे संस्कार विसरत चालले असतानाच विज्ञानाची कास धरत करता येणारी प्रगती तसेच देशातील प्रतिकूल परिस्थितीवरही मात करीत शिक्षणाची कास धरता येते, असा अनोखा संगम घडविणा:या नाटय़ांच्या मालिकाच जणू जळगावकरांना पहायला मिळाली. निमित्त होते 15व्या राज्य बाल नाटय़ स्पर्धेचे. स्पर्धेच्या दुस:या दिवशी आवडीनिवडी जपत अभ्यास करण्याचा संदेश देणारे ‘दादा’, त्यानंतर पुस्तकांनीच पळविता येणारे अभ्यासाचे ‘भूत’, प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षणाची कास धरता येते असे पटवून देणारे ‘मी मलाला’, सोशल मीडियामुळे संस्कृती व संस्काराचा विसर पडत असलेली ‘झपाटलेली चाळ आणि विज्ञानाची कास धरून राष्ट्राची प्रगती साधता येथे ‘टेकडीचे गुढ’मधून सांगणारे एकाहून एक दज्रेदार नाटक प्रेक्षकांची दाद मिळवून गेले. गंधे सभागृहात सुरु असलेल्या 15व्या बाल राज्य नाटय़ स्पर्धेच्या दुस:या दिवशी तंत्रशुध्द आणि बालकलाकारांच्या अभिनयाने नटलेल्या पाच नाटय़ांचे सादरीकरण करण्यात आले. सर्व नाटय़प्रयोगास भरगच्च उपस्थिती लाभून विद्याथ्र्यासह पालक, शिक्षकांनी भरभरुन दाद दिली.
आवडीनिवडी जपत अभ्यास करण्याचा संदेशविवेकानंद प्रतिष्ठानच्या इंग्लिश मीडीयम स्कूलतर्फे योगेश पाटील लिखित व राजेंद्र बावस्कर दिग्दर्शित ‘दादा’ या बालनाटय़ाचे सादरीकरण करण्यात आले. मुन्शी प्रेमचंद यांच्या ‘बडे भाईसाहब’ या कथेवर आधारित असलेल्या बालनाटय़ात चाकोरीबध्द जीवन जगणारा मोठा भाऊ आणि स्वत:च्या आवडीनिवडी छंद जपणारा भाऊ यांच्यातील ऋणानुबंध साकारण्यात आला. शिक्षण घेताना आवडीनिवडी जोपासण्यासोबतच अभ्यास केल्यास तो लवकर लक्षात राहतो. आपले मुलभूत कौशल्यच महत्त्वाचे आहे असा संदेश देणा:या या नाटय़ात आदित्य शिंपी, यतीन पाटील, साक्षी बारी, आयुषी शिंपी, पद्मश्री सोनार, आदिती बोरसे, तन्मेश कापुरे, लिखीत वाणी, अनिकेत पाटील, अनिरुध्द करे, संचित जोशी, चैतन्य मांडे या कलाकारांनी आपल्या उत्स्फूर्त अभिनयाने प्रेक्षकांची दाद मिळविली. ऋषीकेश धर्माधिकारी (प्रकाशयोजना), अनुराधा धायबर (पाश्र्वसंगीत), योगेश शुक्ल (रंगभूषा), आदित्य शिंपी (नेपथ्य) यांनी तांत्रिक बाजू सांभाळली. प्राचार्य ज्ञानेश्वर पाटील हे या नाटकाचे निर्मितीप्रमुख होते.
पुस्तकांनीच पळविले अभ्यासाचे ‘भूत’स्पर्धेतील दुसरे नाटक राज बहुउद्देशीय संस्थेतर्फे विभावरी मोराणकर लिखीत व अश्विनी जाधव दिग्दर्शित भूत या बालनाटय़ाचे सादरीकरण करण्यात आले. सध्याच्या धकाधकीच्या आणि स्पर्धेच्या युगात लहान मुलांवर असलेला अभ्यासाचा तणाव व त्यामुळे कायम अभ्यासात अडकलेल्या या मुलांच्या मानगुटीवर अभ्यासाचे भूत कायम वास करून असते. या भूताला कसे पळवायचे हे विविध विषयांची पुस्तकेच सजीवरुपाने येवून सांगतात हा कल्पनाविलास रंगविणा:या या बालनाटय़ात गौरव अहिरराव, अश्विन वाघ, भारत विधाते, भूषण जोशी, मनोज मोहिते, वर्षा शर्मा यांनी सुरेख अभिनय केला. राजनंदिनी मोहिते (पाश्र्वसंगीत), हर्षला शर्मा (प्रकाशयोजना), लीना लोकचंदानी (नेपथ्य), निशा तायडे (रंगमंच व्यवस्था), पायल मोराणकर (रंगभूषा), मधु साळुंखे (वेशभूषा) यांनी तांत्रिक बाजू सांभाळली.
प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षणाची कासश्रीमती ब.गो.शानबाग माध्यमिक विद्यालय सावखेडातर्फे स्पर्धेतील आजचे तिसरे ‘मी मलाला’ हे योगेश पाटील लिखित नाटक सादर केले. प्रतिकूल परिस्थितीतही बालपण हिरावत असताना शिक्षणाला महत्त्व देणा:या मलालाची ही कथा. वडीलांकडून मिळालेले धारिष्टय़, सहजता यांच्या जोरावर तालिबानी अतिरेक्यांना विरोध करीत आपल्या मैत्रिणींसह शिक्षण घेणारी मलाला जगातील स्त्री शिक्षणाचे महत्त्वच पटवून देते. शांततेचे नोबेल मिळालेल्या मलालाच्या सादरीकरणात सिध्दी उपासनी प्रेक्षकांची दाद मिळवून गेली. तिला जान्हवी पाटील, सिध्दी पाटील, मृणाल पाटील, फाल्गुनी महाशब्दे, अपूर्वा कुळकर्णी, तनया नेवे, कोटिज्या नेमाडे, अनुजा मंजूळ, उत्कर्ष नेरकर, केतन भोळे, अभिजीत जाधव, धनंजय पाटील यांनी उत्कृष्ट साथ दिली. तंत्रशुध्द सादरीकरण असलेल्या या प्रयोगात मनोज पाटील (प्रकाशयोजना), भूषण शिंपी (संगीत), मनोज पाटील (नेपथ्य), सुरेखा शिवरामे (रंगभूषा) यांनी तांत्रिक बाजू सांभाळल्या.
सोशल मीडियामुळे संस्कृती व संस्काराचा विसरस्पर्धेतील चौथ्या क्रमांकाचे नाटक तब्बल 30 कलावंतांचा संच घेऊन अनुभूती इंग्लिश मीडीयम स्कूलने ‘झपाटलेली चाळ’ हे हनुमान सुरवसे लिखित व दिग्दर्शित नाटक सादर केले. सध्या टी.व्ही. आणि मोबाईलचे व्यसन जवळपास सगळ्यांनाच जडले आहे. पण या मीडीयाच्या जगातील काल्पनिक पात्रात गुरफटलेली मुले आपली संस्कृती व संस्कार विसरु लागले आहेत, या गोष्टीची जाणीव करून देणा:या या बालनाटय़ात अनुभूती शाळेतील विद्याथ्र्यांच्या सादरीकरणाने एक वेगळा विचार मांडत प्रभावी सादरीकरण केले. सागर भंडगर (संगीत), पंकज बारी (प्रकाशयोजना), ज्ञानेश्?वर सोनवणे (नेपथ्य), माधवी मेहता (रंगभूषा), सुकिर्ती भालेराव (वेशभूषा), जितेंद्र पाटील (रंगमंच व्यवस्था) यांनी तांत्रिक साथ दिली. निर्मितीप्रमुख प्राचार्या रश्मी लाहोटी या होत्या.
विज्ञानाची कास धरून राष्ट्राची प्रगतीमुलांमध्ये प्रत्येक गोष्टीविषयी असलेली जिज्ञासा त्यांना स्वस्थ बसू देत नाही. यातून समाजाला पर्यायाने राष्ट्राला एक नवीन दिशा मिळते हा संदेश देणारे ‘टेकडीचे गुढ’ हे अलका भटकर लिखित व नारायण घोडके दिग्दर्शित नाटक श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ संचलित महाराणा प्रताप विद्यालय भुसावळने सादर केले. अंधश्रध्देतून निर्माण होणारे गैरसमज आणि वैज्ञानिक दृष्टीकोनातून ही अंधश्रध्दा दूर करणारी मामाच्या गावाला आलेल्या मुलांची ही कथा. गावक:यांना श्रध्दा आणि अंधश्रध्दा यात एक पुसटशी रेषा असते ती फक्त आपल्याला दिसायला हवी. एकदा हा फरक कळला की, विज्ञानाची कास धरून राष्ट्राची प्रगती करता येते असे कथानक असणा:या या नाटय़ात मोहन गोसावी, रोहित बोदडे, दर्शन तांबट, वैष्ण गुरव, निषाद चौधरी, अथर्व उबाळे, अजित चिमोटे, ऋषिकेश घोडके, हर्षल मोरे, सुमित मोरे, नितीन चौधरी, प्रसाद पवार, गिरीष डोंगरे, दिवेश गोरधे, आदित्य पाठक या बालकलाकारांनी उपस्थितांची मने जिंकली. पंकज जोशी, नितीन धुंदये (प्रकाशयोजना), पंकज साखरे, विश्वेश पाटील (नेपथ्य), पंकज साखरे, दिपाली पाटील (रंगभूषा), शरद तायडे, काशिराम बारेला (वेशभूषा), मोहनीश निकम, दीपक महाजन (पाश्र्वसंगीत) यांनी तांत्रिक बाजू सांभळल्या. निर्मितीप्रमुख बापूसाहेब मांडे, महेंद्र मांडे व उषाताई पाटील होत्या.