कोरोनाचा सर्वाधिक फटका शिक्षण क्षेत्राला बसला आहे. यात विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे तीन तेरा झालेले आहे. दुसरीकडे शासन आणि स्थानिक शैक्षणिक प्रशासनाच्या अजब-गजब निर्णयांमुळे विद्यार्थी, पालक शिक्षक वर्गही गोंधळून गेली आहेत. वेळापत्रक जाहीर केले जाते, नंतर परीक्षा रद्द होते. सीईटी परीक्षेची तयारी पूर्ण होते, पण सीईटी घेतली जात नाही. विद्यार्थ्यांकडून परीक्षा अर्ज भरले जाते, पण परीक्षा होत नाही़ या सर्व कारभारामुळे विद्यार्थी अक्षरश: गोंधळून गेली असून शिक्षणाचा कोरोना काळात नुसता 'खेळ मांडला' असल्याची चर्चा पालक वर्गांत सुरु आहे. आता अकरावी सीईटीची परीक्षा रद्द केल्यामुळे जे शुल्क आकारले आहे ते शासन परत करणार का? असा सवालही उपस्थित केला जात आहे. तसेच संभ्रम निर्माण करणारे निर्णय शासनाने घेवू नये, अशीही पालकांकडून प्रतिक्रिया उमटली. दुसरीकडे सक्तीने फी आकारू नये सांगितले जाते, मात्र तसे कुठेही दिसून येत नाही. काही निर्णय तर नावालाचं असल्याची चर्चा पालकांमधून ऐकायला मिळाली.
शिक्षणाचा 'खेळ मांडला'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 4:21 AM