जळगाव : आज आपण जे शिक्षण घेतो त्यात आणि प्रत्यक्ष जीवन, यात मोठी तफावत असल्याने नोकरी, व्यवसाय करताना प्रत्येकाचा मोठा ताणतणाव वाढत आहे. त्यासाठी शिक्षण घेतानाचा त्यात नैतिक, अध्यात्मिक मूल्यांचाही समावेश करीत जीवन मूल्याचे धडे शिक्षणातून मिळणे गरजेचे आहे, असे मत व्यक्तीमक्त विकास प्रशिक्षक जयश्री डागा (कोलकाता) यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.व्यक्तीमक्त विकासाचे प्रशिक्षण देण्यासह धार्मिक कार्याचा प्रचार, प्रसार करणाऱ्या जयश्री डागा या शहरात आल्या असता त्यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला. त्यावेळी प्रश्नोत्तराच्या स्वरुपात डागा यांच्याशी झालेला हा संवाद....प्रश्न - धकाधकीच्या जीवनात तणावापासून कशी मुक्ती मिळू शकते?उत्तर - आज प्रत्येकाकडे वेळ कमी आहे, असे म्हटले जाते. मात्र कोणतेही काम वेळेवर केल्यास व योग्य नियोजन ठेवल्यास कोणतेही काम सहज शक्य होते. महत्त्वाचे म्हणजे भूतकाळाचा व भविष्याचा विचार न करता आज काय स्थिती आहे, ते ओळखून वर्तमानात जगणे शिकले पाहिजे. प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक जण जास्त विचार करतो व तणाव वाढवून घेत असतो. त्यासाठी मानसिक शांती राखत काम केल्यास आपोआपच कार्यक्षमता वाढते व तणाव कमी होण्यास मदत होते.प्रश्न - स्पर्धेच्या युगात यश कसे मिळवावे ?उत्तर - यशासाठी अहिंसेचा मार्ग सुखर आहे. अहिंसेची शिकवण ही केवळ स्वत:वरच नाही तर आपले संपूर्ण कुटुंब, आपला व्यवसाय, सामाजिक जीवन यावर प्रभावशाली आहे. अहिंसेचा भाव ठेवल्यास या सर्व पातळीवर यश मिळविणे शक्य आहे. त्यामुळे स्पर्धेच्या युगातही यातून आपण यश मिळवू शकतो व सर्व समस्यांचेही निराकरण त्यातून होवू शकते.प्रश्न - व्यक्तीमत्व विकासाबाबत काय सल्ला द्याल ?उत्तर - व्यक्तीत्व हे केवळ बाह्य असू नये तर आपल्या वागण्या-बोलण्यातूनही उत्तम व्यक्तीमत्त्वाची छाप पडली पाहिजे. शारीरिक व्यक्तीमत्त्वासह प्रत्येक जण मानसिक, भावनात्मक, अध्यात्मिक पातळीवर विकसित झाला तर त्याचा खरा व्यक्तीमत्त्व विकास होवू शकतो.वेळेला महत्त्व द्यादैनंदिन जीवनात कोणतेही काम करताना ते वेळेवर होणे महत्त्वाचे असून एकदा वेळ चुकली की अडथळे येतात व त्याचा आपल्या जीवनावर परिणाम होतो. यासाठी वेळेचे योग्य व्यवस्थापन महत्त्वाचे आहे.- जयश्री डागा, व्यक्तीमक्त विकास प्रशिक्षक
शिक्षणात नैतिक, अध्यात्मिक मूल्यांचा समावेश असावा - जयश्री डागा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2019 12:29 AM