चाळीसगाव, जि.जळगाव : सामान्य नागरिकांसाठी ई-बँकिंग सेवा सुरू होऊन १० ते १२ वर्षे होऊन गेली असून, त्यात मिळणाऱ्या सुविधांमध्ये दिवसेंदिवस वाढतच आहे. मोबाइलवरून खात्यातील उलाढाल करायची साथही त्यास मिळाली आहे. या सेवा सुविधा देण्यासाठी आणि त्यांची उच्च प्रतीची गुणवत्ता ठेवण्यासाठी भरपूर प्रयत्न आणि गुंतवणूकही होत आहे. परंतु या सेवा-सुविधांचा वापर कितपत होत आहे याचा आढावा घेण्याची आवश्यकता आहे. ई बँकींग सेवेतून पारदर्शकता बाळगायला हवी असल्याचे मत बँक आॅफ महाराष्ट्र शाखेचे व्यवस्थापक चेतन अवसरे यांनी व्यक्त केले.ते शुक्रवारी रोटरी क्लब आयोजित 'बँक व आॅनलाईन व्यवहारातील सतर्कता' या विषयावर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर रोटरी क्लबचे सचिव रोशन ताथेड, नरेंद्र शिरुडे उपस्थित होते.नेट बँकिंग, मोबाइल बँकिंग सेवा वापरताना काळजी घेणे जरुरीचे आहे. पासवर्ड, पिन सांभाळून ठेवणे हा त्यातील महत्त्वाचा मुद्दा आहे. ई-मेलवरून आलेल्या प्रलोभनांना बळी न पडण्याची काळजी घेतल्यास आपण आपला व्यवहार सुरक्षित ठेवला जातो. कर्ज किंवा क्रेडिट कार्डसाठी अर्ज केल्यास नक्कीच सिबिल रिपोर्ट किंवा सिबिल ट्रान्सयुनियन ही परिभाषा आढळून येते. रोजगार आणि उत्पन्नाखेरीज सिबिल रिपोर्ट व स्कोर हा कर्ज किंवा क्रेडिट कार्डच्या मान्यतेचा महत्वाचा अंश राहिला आहे. सिबिल रिपोर्ट व स्कोरशिवाय क्वचितच कर्ज किंवा क्रेडिट कार्ड यांना मंजूरी मिळत असते.दर महिन्याच्या कर्ज किंवा क्रेडिट कार्डच्या परतफेडीचा इतिहास दर्शविला जात असतो. क्रेडिट स्कोर तुमच्या क्रेडिट हिस्टरीचा संख्यात्मक दर्शक असतो ज्यामुळे कर्जाचे व आर्थिक प्रमाण मिळते. बँकेच्या कर्ज मंजुरीच्या धोरणाप्रमाणे कर्ज मंजूर होण्यासाठी क्रेडिट स्कोरची किमान मयार्दा असली तरीही साधारणपणे निम्म शतकाहून अधिक सिबिल ट्रान्सयुनियन स्कोर असला तरच बँका ग्राहकांना कर्जपुरवठा करतात हे लक्षात घेणे जरुरीचे असल्याचे चेतन अवसरे यांनी संवाद साधताना सांगितले.यावेळी उपस्थितांना प्रामाणिकतेची शपथ देण्यात आली.याप्रसंगी शंतनू पटवे, बलदेव पुन्शी, किरण देशमुख, बाळासाहेब सोनवणे, मंदार चिंधडे, विनोद बोरा, राजेंद्र कटारिया, संग्रामसिंग शिंदे, प्रवीण वाणी, तेनसिंग राजपूत, हर्षद ढाके, संदीप चव्हाण, डॉ.स्वप्नील शिंदे, डॉ.राहुल महाजन, केतन वाघ आदी रोटेरियन पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन रोशन ताथेड यांनी केले .
ई बँकिंग सेवेतून व्यवहारात पारदर्शकता येण्यासाठी सर्वार्थाने प्रयत्न आवश्यक -चेतन अवसरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2019 4:24 PM