किरण चौधरीरावेर, जि.जळगाव : कोरोनाच्या महामारीत आॅक्सिजनअभावी रुग्णांना जळगाव व भुसावळ येथे पाठवावे लागत असल्याने रावेर ग्रामीण रुग्णालयात कायमस्वरूपी ५० बेड असलेला आॅक्सिजनयुक्त वॉर्ड लोकसहभागातून उभारण्याची संकल्पना तालुक्यातील रुग्णांसाठी खऱ्या अर्थाने आरोग्यदूत ठरलेल्या प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी बुधवारी तहसील कार्यालयात मांडली. त्यास तालुक्यातील लोकप्रतिनिधी, व्यापारीवर्ग, डॉक्टरवर्गासह दातृत्वाची भावना असलेल्या दात्यांनी सढळ हात पुढे करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाबाधित रुग्णांच्या शरीरातील रक्तात आॅक्सिजनचे प्रमाण कमी झाल्यास आॅक्सिजनची तातडीने गरज असलेल्या रुग्णांना भुसावळ तथा जळगाव येथील रुग्णालयात पाठवण्याची गरज भासत असते. या ४५ ते ७५ कि.मी. अंतर कापताना रुग्णांची प्राणहानी होण्याची शक्यता जास्त असते. रावेर ग्रामीण रुग्णालयातच आॅक्सिजनयुक्त ५० खाटांची तालुक्यातील जनतेच्या लोकसहभागातून उभारणी करण्याची संकल्पना प्रांताधिकारी डॉ.थोरबोले यांनी मांडली. किंबहुना, कोविड -१९ हे निमित्त असले तरी भविष्यात तालुकावासीयांसाठी ही कायमची जीवदान देणारी सुविधा उपलब्ध होणार असल्याने डॉ.थोरबोले मात्र खºया अर्थाने आरोग्यदूत ठरले आहेत.त्यांच्या या संकल्पनेवर लोकप्रतिनिधींच्या बैठकीत आमदार शिरीष चौधरी, नगराध्यक्ष दारा मोहंमद, उपनगराध्यक्ष राजेंद्र महाजन, नगरसेवक अॅड.सूरज चौधरी, नगरसेवक आसिफ मोहंमद, माजी नगराध्यक्ष हरिष गणवाणी, रावेरचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ.दत्तप्रसाद दलाल, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.संदीप पाटील, सरपंच तथा कृउबा सभापती श्रीकांत महाजन, नेहता सरपंच महेंद्र पाटील, केºहाळे बुद्रूक येथील सरपंच राहूल पाटील, बलवाडीचे सरपंच तथा शहरातील व्यापारी वर्गातील कन्हैयालाल अग्रवाल, माजी नगरसेवक अनिल अग्रवाल, पं.स.सदस्य योगेश पाटील, मोतीराम खटवाणी, चेतक गिनोत्रा, किशोर तोलाणी आदींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवला आहे.डॉ.थोरबोले यांनी आॅक्सिजनयुक्त ५० बेडसाठी अंदाजे साडेतीन लाख रु. उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून लोकसहभागातून हे शिवधनुष्य पेलण्यासाठी मोठे यश साध्य ठरणार असल्याचे समाजमनातून कौतुक होत आहे.
रावेर ग्रामीण रुग्णालयात ५० आॅक्सिजनयुक्त बेड उभारणीसाठी सरसावले हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2020 5:40 PM
आॅक्सिजनअभावी रुग्णांना जळगाव व भुसावळ येथे पाठवावे लागत असल्याने रावेर ग्रामीण रुग्णालयात कायमस्वरूपी ५० बेड असलेला आॅक्सिजनयुक्त वॉर्ड लोकसहभागातून उभारण्याची संकल्पना रुग्णांसाठी खऱ्या अर्थाने आरोग्यदूत ठरलेल्या प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी मांडली.
ठळक मुद्देप्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांच्या माध्यमातून अत्यवस्थेतील रुग्णांना जीवदान देण्यासाठी आरोग्यदूत आले धावूनभविष्यात तालुकावासीयांसाठी ही कायमची जीवदान देणारी सुविधा उपलब्ध होणार