चाळीसगाव : निर्माल्य संकलन मोहिमेतंर्गत रविवारी घरोघरी निर्माल्य संकलन रथ फिरविण्यात आला. एकुण ८०० किलो निर्माल्य संकलन झाले. युनिटी क्लबसह पर्यावरणप्रेमींनी हा उपक्रम राबविला. सहभागी झालेल्या मंडळांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.चाळीसगाव शहरात गणेश उत्सवातील निर्माल्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी युनिटी क्लब व पर्यावरण प्रेमी यांच्यातर्फे निर्माल्य संकलन मोहिम राबविण्यात आली. यात शहरात निर्माल्य रथाद्वारे जनजागृती करण्यात आली तर मोहीमेत सहभागी गणेशोत्सव मंडळांना युनिटी क्लब व पर्यावरण प्रेमींच्या वतीने प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.स्वप्निल कोतकर, मनिष मेहता, प्रवीण बागड, हेमंत वाणी, गणेश सूर्यवंशी, निशांत पाठक, स्वप्निल धामणे, विनोद चौधरी, गितेश कोटस्थाने, विशाल गोरे, नीलेश जैन, योगेश ब्राह्मणकर, युवराज शिंपी, पियुष सोनगिरे, सतिष जैन यांनी सहभाग घेतला.
चाळीसगावला आठ टन निर्माल्य संकलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 11:18 PM
निर्माल्य संकलन मोहिमेतंर्गत रविवारी घरोघरी निर्माल्य संकलन रथ फिरविण्यात आला. एकुण ८०० किलो निर्माल्य संकलन झाले.
ठळक मुद्देयुनिटी क्लब व पर्यावरण प्रेमींचा उपक्रममंडळांचे केले प्रशस्तीपत्रक देऊन कौतुकनिर्माल्य रथाद्वारे केली जनजागृती