लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महानगर शिवसेना, युवा शक्ती फाउंडेशन आणि जिल्हा डॉजबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त बी.यू.एन. रायसोनी विद्यालयात झालेल्या जिल्हास्तरीय डॉजबॉल अजिंक्यपद स्पर्धेत मुलांच्या गटात एकलव्य क्रीडा संकुल आणि मुलींच्या गटात स्वामी विवेकानंद महाविद्यालयाने उपविजेतेपद पटकावले. तर नूतन मराठा विद्यालय, चुंचाळे ता. चोपडाने तृतीय स्थान मिळवले. मुलींच्या गटात बीयूएन रायसोनी स्कूलने जेतेपद पटकावले.
मुलींच्या गटात स्वामी विवेकानंद महाविद्यालयाने दुसरे स्थान तर रायसोनी स्कूलने तिसरे स्थान पटकावले.
उद्घाटन पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, महानगर प्रमुख शरद तायडे, महिला आघाडीच्या अध्यक्ष शोभा चौधरी, युवा शक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष विराज कावडिया, रायसोनी संस्थेचे अध्यक्ष शिरीष रायसोनी, प्रकाश बेदमुथा, मानसिंग सोनवणे, गणेश गायकवाड, प्रशांत सुरळकर, जाकीर पठाण, हेमंत महाजन, जितेंद्र छाजेड उपस्थित होते.
पारितोषिक वितरण जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शरद तायडे, नगरसेवक प्रशांत नाईक, विद्यालयाचे मुख्याध्यापक चंद्रशेखर पाटील, क्रीडा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष डॉ. रणजित पाटील उपस्थित होते.
या स्पर्धेत जिल्ह्यातून मुलांचे १८ आणि मुलींचे ८ संघ सहभागी झाले होते. स्पर्धा बाद पद्धतीने खेळवण्यात आली.
पंच म्हणून नीलेश पाटील, प्रशांत महाजन, सुनील बाविस्कर, योगेश सोनवणे, प्रकाश सपकाळे, सुष्मीत पाटील, ललित कोळी, उज्ज्वल जाधव, चेतन जोशी, जयवीरसिंग राजपूत, गौरव शिरसाळे, मुकेश परदेशी, विजय विसपुते यांनी काम पाहिले.
सूत्रसंचालन जिल्हा डॉजबॉल असोसिएशनचे सचिव राजेश जाधव यांनी केले. आभार नीलेश पाटील यांनी मानले.
यशस्वितेसाठी युवाशक्ती फाउंडेशनचे सचिव अमित जगताप, उमाकांत जाधव, संदीप सूर्यवंशी, प्रीतम शिंदे, आकाश वाणी, धीरज पाटील, प्रशांत वाणी, जयेश महाजन, निखिल पाटील, सौरभ कुलकर्णी, राहुल चव्हाण, प्रसन्न जाधव, अमोल गोपाळ, गोकुळ बारी, जयेश महाजन यांनी परिश्रम घेतले.