शहरं
Join us  
Trending Stories
1
GST संकलनात 6.5 टक्क्यांची वाढ; सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटींची वसुली
2
"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!
3
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
4
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
5
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
6
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
7
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
8
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
9
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव
10
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ
11
माझा पुढचा जन्म 'या' राज्यातच व्हावा, अशी माझी इच्छा आहे; धीरेंद्र शास्त्री यांचं विधान
12
"लेबनानमधील पेजर हल्ला हा इस्रायलचा 'मास्टरस्ट्रोक', भारतात जर असा प्रयत्न झाला तर..."
13
हरियाणा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला धक्का; कोर्टाचा आदेश, "आत्मसमर्पण करा, अन्यथा..." 
14
तिरुपती लाडू भेसळ प्रकरणाचा तपास एसआयटीकडून स्थगित, सांगितलं 'हे' कारण...
15
विराट कोहलीपेक्षा अब्दुला शफीकचा रेकॉर्ड चांगला आहे; पाकिस्तानच्या कर्णधाराचा दावा
16
"अंबानींच्या लग्नावर करोडोंचा खर्च, पण शेतकरी...", राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
17
सासूच्या मृत्यूची बातमी, तरीही सेटवर हसत होती 'ही' अभिनेत्री, नवऱ्याने असं केलं रिएक्ट
18
“भाजपासाठी महाराष्ट्र हे ATM, मोदी-शाह यांच्या दौऱ्याचा मविआलाच फायदा”; काँग्रेसची टीका
19
"विमानांप्रमाणे आता एसटीच्या ई- शिवनेरी बसमध्ये दिसणार शिवनेरी सुंदरी’’, भरत गोगावले यांची घोषणा
20
Irani Cup 2024 : मैं हूँ ना! मुंबईचा खडतर प्रवास; पण अजिंक्य रहाणेचा 'संयम', अय्यर-सर्फराजची चांगली साथ

Eknath Khadse: “जळगावमधून भाजप भुईसपाट होत चाललीय”; नाथाभाऊंचा गिरीश महाजनांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2022 12:34 PM

Eknath Khadse: आगामी जळगाव जिल्ह्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने आतापासून तयारी सुरू केली आहे.

जळगाव: भाजपला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या एकनाथ खडसे (Eknath Khadse) सातत्याने भाजपवर टीका करत असतात. एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा भाजप आणि भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यावर निशाणा साधला आहे. आगामी जळगाव जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांनी घेतलेल्या एक बैठकीमुळे एकनाथ खडसे यांचा तिळपापड झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. जळगावमधून भाजप भुईसपाट होत चालली असल्याची टीका एकनाथ खडसेंनी केली आहे.

आगामी जळगाव जिल्ह्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने आतापासून तयारी सुरू केली आहे. भाजप नेते गिरीश महाजनांनी बैठकीचे सत्र सुरू केले आहे. आगामी सर्व निवडणुका भाजप स्वबळावर लढणार असल्याचे सांगितले जात आहे. निवडणुका कधीही जाहीर होऊ द्या. मात्र, कार्यकर्त्यांनी आत्तापासूनच कामाला लागावे, अशा सूचना भाजपकडून देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. 

पंचायत समिती निवडणुकीची झलक

भाजपने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे समजताच एकनाथ खडसे यांनी जोरदार टीका केली. भाजपची नगरपालिका, नगपंचायत निवडणुकीवर ताकद दिसून आली. जळगावमध्ये भाजप भुईसपाट होत चालली आहे. ही आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची झलक आहे, अशा इशारा खडसे यांनी दिला. ते टीव्ही९शी बोलत होते. दुसरीकडे, शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील आणि एकनाथ खडसे यांच्यातही सतत कलगीतुरा रंगत आहे.

दरम्यान, राज्यातील महत्त्वाची महापालिका म्हणून नाशिककडे पाहिले जात आहे. या महापालिका निवडणुकीचे नेतृत्व कोणाकडे असणार याची चर्चा आता सुरू झाली असून, देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याकडे लक्ष लागल्याचे म्हटले जात आहे. 

टॅग्स :Jalgaonजळगावeknath khadseएकनाथ खडसेGirish Mahajanगिरीश महाजनPoliticsराजकारण