लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : राष्ट्रवादीचे नेते व आमदार एकनाथ खडसे यांना देण्यात आलेली ‘वाय’ दर्जाची सुरक्षा शुक्रवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास काढून घेण्यात आली आहे. दूध संघातील चोरी प्रकरणात गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी खडसे यांनी गुरुवारी सायंकाळपासून पोलीस स्टेशन आवारात आंदोलन सुरू केले होते. हे आंदोलन सुरू असतानाच शुक्रवारी पहाटे ३ वाजता शिंदे सरकारने खडसेंना दणका देत, त्यांची सुरक्षा व्यवस्था काढण्याचा निर्णय घेतला.
आंदोलन केले म्हणून...
मला १९९१ पासून ‘वाय’ दर्जाचे संरक्षण देण्यात आले होते. त्यात कमीअधिक प्रमाणात वाढ किंवा घट झाली. मात्र, ३१ वर्षांनंतर मला दिलेली सुरक्षा राज्य शासनाने काढून घेतली. राज्य शासनाविरोधात आंदोलन केल्यामुळेच ही सुरक्षा काढण्यात आल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"