शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
5
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
6
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
7
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
8
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
9
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
10
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
11
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
12
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
13
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
14
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
15
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
16
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
17
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
18
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
19
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
20
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या मताधिक्य देण्याच्या आव्हानास एकनाथराव खडसेंचे दमदार उत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 11:09 PM

रावेर येथील जाहीर सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी रक्षा खडसे यांना जामनेरपेक्षा अधिक मताधिक्य मिळवून दाखवा’ या जाहीर आव्हानाला माजी मंत्री मथा आमदार एकनाथराव खडसे यांनी मुक्ताईनगर मतदारसंघातून जामनेरपेक्षा तब्बल १४ हजार २८५ अधिकच्या मताधिक्याने जोरदार उत्तर दिले आहे.

ठळक मुद्देजामनेरपेक्षा मुक्ताईनगरात तब्बल १४ हजार २८५ अधिक मताधिक्यमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या जाहीर सभेत गिरीश महाजन यांनी दिले होते आव्हानमतदान यंत्राच्या माध्यमातून एकनाथराव खडसेेंनीही दिले हजरजबाबी उत्तर

मतीन शेखमुक्ताईनगर, जि.जळगाव : रावेर येथील जाहीर सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी रक्षा खडसे यांना जामनेरपेक्षा अधिक मताधिक्य मिळवून दाखवा’ या जाहीर आव्हानाला माजी मंत्री मथा आमदार एकनाथराव खडसे यांनी मुक्ताईनगर मतदारसंघातून जामनेरपेक्षा तब्बल १४ हजार २८५ अधिकच्या मताधिक्याने जोरदार उत्तर दिले आहे.जामनेर विधानसभा मतदारसंघातून रक्षा खडसे यांना ४५ हजार ५७१, तर मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून ५९ हजार ८५६ इतके मताधिक्य आहे. संकटमोचक म्हणून ओळख असलेल्या मंत्री गिरीश महाजन यांना खडसेंनी यानिमित्ताने राजकीय मुरब्बीपणा दाखविला आहे.रावेर लोकसभा मतदारसंघात खासदार रक्षा खडसे यांनी ३ लाख ३५ हजार ८८२ मतांनी विजय मिळविला. यात चोपडा विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक ७७ हजार ३३० चे मताधिक्य मिळाले आहे, तर सर्वात कमी रावेर विधानसभा मतदारसंघातून ३९ हजार ३२९ चे मताधिक्य मिळाले आहे.विधानसभा क्षेत्रनिहाय मताधिक्यात भुसावळ विधानसभा मतदारसंघात डॉ.उल्हास पाटील यांना ४४ हजार ५०६, तर रक्षा खडसे यांना ९५ हजार ३९४ असे मतदान मिळाले आहे. येथे आमदार संजय सावकारे यांनी ५० हजारांचे मताधिक्य देण्याचा दावा केला होता. दिलेल्या शब्दाप्रमाणे ५० हजार ८८८ मतांचे मताधिक्य रक्षा खडसे यांना मिळाले आहे. चोपडा विधानसभा मतदारसंघात डॉ.उल्हास पाटील यांना ४९ हजार ३७५, तर रक्षा खडसे यांना १ लाख २६ हजार ७०७ मते मिळाली आहे. या ठिकाणी रक्षा खडसे ७७ हजार ३३० मतांनी पुढे आहेत.मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात डॉ.उल्हास पाटील यांना ४७ हजार ५३०, तर रक्षा खडसे यांना १ लाख ७ हजार ३८६ मते आहेत. येथे ५९ हजार ८५६ मतांच्या मताधिक्याने रक्षा खडसे पुढे राहिल्या.रावेर विधानसभा मतदारसंघात डॉ.उल्हास पाटील यांना ६८ हजार ६७९, तर रक्षा खडसे यांना१ लाख ८ हजार ८ मते मिळाली आहे. याठिकाणी ३९ हजार ३२९ मतांचे मताधिक्य रक्षा खडसे यांना मिळाले आहे. टपाली मतदानातही रक्षा खडसे यांनी आघाडी घेतली आहे. यात डॉ.उल्हास पाटील यांना ७६४, तर रक्षा खडसे यांना ३ हजार १७४ मते मिळाली आहे. 

टॅग्स :ElectionनिवडणूकMuktainagarमुक्ताईनगर