शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
2
राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
3
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
4
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
5
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्राचा एक्झिट पोल येण्यास सुरुवात; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
6
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
7
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
8
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
9
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
10
IND vs AUS: शुबमन गिल संघात केव्हा परतणार? बॉलिंग कोच मॉर्कलने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
11
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
12
“माझा मुलगा युद्धात लढून जिंकेल याचा अभिमान, अमितचा मोठा विजय हवा आहे”: शर्मिला ठाकरे
13
रोहित नसताना जसप्रीत बुमराहच कर्णधार! मॉर्कलच्या प्रेस कॉन्फरन्समुळे चर्चांना पूर्णविराम
14
Video - "मीरापूरमध्ये रिव्हॉल्व्हर दाखवून SHO ने मतदारांना धमकावलं"; अखिलेश यादवांचा आरोप
15
पाकिस्तानमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला; चौकी उडविली, १७ सैनिकांचा मृत्यू
16
निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना
17
मणिपूरमधील उग्रवाद्यांविरुद्ध सरकार काय कारवाई करणार? मुख्यमंत्री बिरेन सिंह यांचा खुलासा
18
“‘तो’ आवाज माझा नाही, भाजपाकडून खोडसाळपणा”; बिटकॉइन स्कॅमचे आरोप नाना पटोलेंनी फेटाळले
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
20
बिटकॉइन प्रकरण : "त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच”; अजित पवार स्पष्टच बोलले 

मुक्ताईनगर नगरपंचायतीवर एकनाथराव खडसे यांचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 12:55 PM

भाजपा नेते आमदार एकनाथराव खडसे यांचा मतदार संघ असलेल्या मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या पहिल्या वहिल्या निवडणुकीत भाजपाने निर्विवाद वर्चस्व मिळवित १७ पैकी १३ जागा मिळविल्या आहेत. लोकनियुक्त नगराध्यक्षपदी भाजपाच्या नजमा तडवी ह्या ११७५ मतांनी विजयी झाल्या. शिवसेनेला ३ आणि एक जागा अपक्षाने मिळविली आहे.

ठळक मुद्देनिवडणुकीत १७ पैकी १३ जागांवर भाजपा विजयीनगराध्यक्षपदी भाजपाच्या नजमा तडवी विजयीशिवसेनेला ३ तर अपक्षाला एक जागा

जळगाव - भाजपा नेते आमदार एकनाथराव खडसे यांचा मतदार संघ असलेल्या मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या पहिल्या वहिल्या निवडणुकीत भाजपाने निर्विवाद वर्चस्व मिळवित १७ पैकी १३ जागा मिळविल्या आहेत. लोकनियुक्त नगराध्यक्षपदी भाजपाच्या नजमा तडवी ह्या ११७५ मतांनी विजयी झाल्या. शिवसेनेला ३ आणि एक जागा अपक्षाने मिळविली आहे.मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या मतमोजणीस सकाळी १० वाजेपासून सुरुवात झाली. पहिल्या दहा मिनिटातच भाजपाच्या दोन उमेदवारांनी विजयी सलामी दिली. यानंत भाजपाने विजयी घौडदौड कायम ठेवली. विशेष म्हणजे सहा जागांवर भाजपाचे मुस्लीम उमेदवार निवडून आले आहेत.विजयी उमेदवारांची नावे व कंसात त्यांना मिळालेली मते अशी आहेत.भाजपा - संतोष प्रल्हाद कोळी (२४६), शबानाबी अब्दुल आरीफ (३८९), बिल्कीसबी अमानुल्ला खान (३२४), शमीम अहमद खान (२४३), मुकेश कैलास वानखेडे (४३५), पियुष भागवत मोरे (४००), साधना हरिश्चंद्र ससाणे (४७९), बिल्कीसबी आसीफ बागवान (२८४), शेख शकील शेख शकुर खाटीक (२३८), मस्तान इमाम शेख (३६२), कुंदा अनिल पाटील (६०९), नीलेश प्रभाकर शिरसाळे (३३१), मनिषा प्रविण पाटील (३६०)शिवसेना - संतोष सुपडू मराठे (४११), राजेंद्र सुकदेव हिवराळे (४६७), सविता सुभाष भलभले .अपक्ष - नुसरत बी. मेहमुब खान (३३३),प्रभाग क्र. ११ मध्ये भाजपाचे शेख मस्तान यांंंना ३६२ तर अपक्ष जफर अली नजीर अली यांना ३६० मते मिळाली. जफर अली यांच्या मागणीनुसार पुन्हा मतमोजणी करण्यात आली. यात शेख मस्तान हे विजयी उमेदवार कायम राहिले. दुसरीकडे प्रभाग क्र. १४ मध्येही अपक्ष शीतल सापधरे यांना ३९५ तर शिवसेनेच्या सविता सुभाष भलभले यांना ३९२ मते मिळाल्याचे जाहीर करण्यात आले होते. भलभले यांच्या मागणीनुसार या प्रभागातही पुन्हा मतमोजणी करण्यात आली. यात सविता भलभले यांना विजयी घोषित करण्यात आले. त्यामुळे शिवसेनेचा फायदा झाला.पक्षीय बलालबएकूण जागा -१७भाजपा -१३शिवसेना- ३अपक्ष -१

टॅग्स :Muktainagarमुक्ताईनगरEknath Khadaseएकनाथ खडसेnagaradhyakshaनगराध्यक्ष