मुक्ताईनगर : प्रकृती अस्वस्थतेमुळे मुंबई येथे उपचार घेत असलेले माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे शनिवारी पहाटे मुक्ताईनगर येथे दाखल झाले आहेत. ठासून भरलेल्या मनोबलाने ते पुन्हा सक्रिय झाले आलेत. खडसेच्या आगमनाने रावेर लोकसभा मतदार संघासह जिल्हाभरातील राजकीय घडामोळींना वेग आला आहे. कार्यकर्ते उत्साहित झाले आहेत व भेटीसाठी फार्म हाऊसवर गर्दी करीत आहेत.आमदार खडसे यांनी सक्तीने आराम करावा असा सल्ला त्यांना डॉक्टरांनी दिला असलातरी नेहमी प्रमाणे अगदी बेडरूममध्ये कार्यकर्त्यांना प्रवेश देऊन खडसेंनी सक्रिय झाल्याचा संदेश दिला आहे.मुंबई येथून दूरांतो एक्सप्रेसने शनिवारी पहाटे ३ च्या सुमारास त्यांचे आगमन झाले. ते थेट भुसावळ येथून मुक्ताईनगर फार्म हाऊसवर पोहोचले. सकाळी १० वाजेपासून पदाधिकाऱ्यांनी भेटीसाठी त्यांच्या फार्म हाऊसवर गर्दी केली होती.लोकसभेच्या रणधुमाळीत गेल्या १८ दिवसा पासून दूर असलेले खडसे यांच्या हजेरीने ‘टायगर इज बॅक’ म्हणत खडसेंच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य आले आहे.भेटीसाठी येणाºया कार्यकर्त्यांना खडसे त्यांच्या गावातील परिस्थिती, बूथ प्रमुख, पेज प्रमुख, मतदान कसे काढणार या पासून तर प्रतिस्पर्धी उमेदवाराची खबरबात घेत होते. यावेळी लोकसभा निवडणुकीबाबत मायक्रो मॅनेजमेंट करणारे प्रा. सुनील नेवे उपस्थित होते.
आरामासाठी नातेवाईकांकडून धावपळखडसे यांना आराम मिळावा या साठी त्यांचे भाच जवाई गोपाळ सरोदे यांची खटपट सुरू होती. अगदी बेडरूम मध्ये कार्यकर्ते जात होते. बाहेर हॉल मध्यही गर्दी होती. सर्वांना भेटता यावे म्हणून खडसे हॉल मध्ये पोहोचले. येथे कार्यकर्त्यां कडून मतदार संघातील हालचाली खडसे जाणून घेत होते. अधून मधून काम घेऊन आलेल्या कार्यकर्त्यांन साठी फोन ही लावत होते.