जळगाव : भाजप नेते एकनाथराव खडसे यांनी चार दिवसापूर्वी दिल्लीत पक्षाचे राष्टÑीय कार्याध्यक्ष जे.पी.नड्डा यांची भेट घेतली. त्यानंतर खडसे यांचे सूर बदलले आहेत. नड्डा यांनी विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाईचे आश्वासन दिल्याची माहिती खडसे यांनी दिली. पक्ष विरोधी काम करणाºयांवर कारवाई केल्यानंतरच आपले समाधान होईल, असे एकनाथराव खडसे यांनी गुरुवारी सायंकाळी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.लेवा एज्युकेशनल युनियनच्या शताब्दी महोत्सवाच्या सांगता समारंभानिमित्त डॉ.अण्णासाहेब जी.डी.बेंडाळे महाविद्यालयात डॉ. जब्बार पटेल यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी खडसे होते. हा कार्यक्रम संपल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, नड्डा यांनी आपणाास बोलावून घेतले होते. यावेळी त्यांनी राजकीय स्थितीबाबत चर्चा केली. विधानसभा निवडणुकीत जे काही झाले. तसेच पक्षातीलच काही सदस्यांनी पक्षाचा उमेदवार पाडण्यासाठी काम केल्याची माहिती घेतली. त्यावर नड्डा यांनी चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार यांना दिल्लीला बोलावून त्यांच्याशी चर्चा करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, पक्ष सोडण्याबाबत खडसे यांनी पत्रकारांशी बोलणे टाळले. तसेच काही दिवसांपासून राज्यातील पक्ष नेतृत्वाबद्दल आक्रमक असलेले खडसे काहीसे नरमलेले दिसून आले.‘सामना’ तील मारुती कांबळेचे काय झाले ?डॉ. पटेलांनी दिग्दर्शित केलेले सिंहासन, सामना हे चित्रपट राजकारणावर आहेत. या चित्रपटांचा माझ्या जीवनावर मोठा प्रभाव राहिला आहे. एखाद्यावर अन्याय झाला असेल आणि विधानसभेत असताना मला त्याच्याविषयी गृहमंत्री किंवा मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारायचा असेल तर मी सामना चित्रपटातील अनेक संवादांचा वापर करायचो. या चित्रपटातील मारुती कांबळे याचे काय झाले? हा प्रश्न चित्रपट बघितल्यानंतर सगळ्यांनाच पडला. तसाच अनुभव जीवनात मला आला. राजकारणात माझे काय झाले? या प्रश्नाचे उत्तर मलाच अजून मिळालेले नाही, अशी व्यथाही खडसेंनी मांडली.‘सिंहासन’ चित्रपटप्रमाणे सध्याचे राजकारण सुरुडॉ. जब्बार पटेल यांचे दिग्दर्शन असलेला ह्यसिंहासनह्ण हा चित्रपट राजकारणावर आधारित आहे. सध्या याच चित्रपटाप्रमाणे राज्याच्या राजकारणात घडामोडी घडत आहेत, अशा तिरकस शब्दात खडसे यांनी राज्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले.
पक्ष विरोधी काम करणाऱ्यांवर कारवाईनंतरच समाधानी होणार - एकनाथराव खडसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 12:09 PM