शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

वडिल शिक्षक, त्यांच्या प्रेरणेतून ‘शिक्षकी पेशात आलो’ - प्रा़ डॉ़ पी़पी़माहुलीकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2019 1:46 PM

अधिव्याख्याता ते प्र-कुलगुरूपर्यंतचा प्रवास करणाऱ्या प्रा़ डॉ़ पी़पी़माहुलीकर यांच्या आयुष्याला वडिलांसह प्रा़ आऱबी़माने यांनी दिला आकाऱ़़

जळगाव: वडिल प्राथमिक शिक्षक़ त्यांच्याच शाळेत प्राथमिक शिक्षण घेतले़ त्यांचा अध्यापनाचा विषय गणित आणि विज्ञान, म्हणून या विषयांमध्ये आवड निर्माण झाली़ इतर विद्यार्थ्यांप्रमाणे मलाही शिक्षा व्हायची़ त्यामुळे अभ्यासात नेहमी चांगला राहिलो़ विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मूलभूत पाया पक्का करण्यासाठी वडिलांनी घेतलेले कष्ट मी जवळून पाहिले़ म्हणून वडिलांप्रमाणे शिक्षक व्हायचे स्वप्न बघितले़ अन् वडील पांडूरंग माहुलीकर यांच्या प्रेरणेतून ‘शिक्षकी पेशात आलो’़ याचा मला फार आनंद झाला होता़ हा अनुभव सांगताना विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा़ डॉ़पी़पी़माहुलीकर यांनी आपल्या शिक्षकांप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त करीत होते.पदव्युत्तर शिक्षणाप्रसंगीच आरटीओ व रेंज फॉरेस्ट म्हणून निवड झाली़ पण, झिरो बजेटमुळे ती भरती रद्द झाली़ खचलो नाही, पीएच़डी़पूर्ण केली आणि सन १९९३ मध्ये पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव महाविद्यालयात अधिव्याख्याता म्हणून नोकरी मिळाली़ नंतर १९९४ मध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात पेस्टिसाईडस् व अ‍ॅग्रो केमिकल्स विषयाचा अधिव्याख्याता म्हणून रुजू झालो़ हळूहळू प्रपाठक व प्राध्यापक झालो़ हा प्रवास इथेच थांबला नाही तर बीसीयूडी संचालक पदाची धुरा सांभाळल्यानंतर प्र-कुलगुरू म्हणून आज कार्यरत आहे़ हे सर्व शिक्षकांमुळे, अर्थातच सर्व श्रेय गुरुजनांना. आज शिक्षक दिनी त्यांना वंदन...!जेव्हा शिक्षक मित्र बनतात...अन् मिळतो प्रोत्साहनसांगली जिल्ह्यातील माहुली येथील ते मूळ रहिवासी़ वडिल माहुली जि़प़ शाळेत शिक्षक आणि त्याच शाळेत मी प्राथमिक शिक्षण पुर्ण केले़ स्वत:चा मुलगा म्हणून नव्हे तर इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच मीही त्यांचा विद्यार्थी आहे, अशी वागणूक वडिल द्यायचे़ शिक्षाही व्हायची़ पण, या शिक्षेमुळे माझ्या जीवनाला आकार मिळाला़ नंतर गावातच माध्यमिक शिक्षण पुर्ण केले़ त्यानंतर विटा येथील बळवंतमहाविद्यालयात बीएस्सी केमेस्ट्रीची पदवी प्राप्त केली़ व एम़एसस्सी के मिस्ट्री ही पदव्युत्तर पदवी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात प्राप्त केली़ याप्रसंगी माझे प्रा़ आऱबी़माने हे चांगले शिक्षक आणि एक चांगले मित्रही़ संशोधनाच्या प्रात्यक्षिकांमध्ये मी कधीही उपयशी ठरलो नाही़ काही तरी निर्णय मिळायचाचं़ हे प्रा़ आऱबी़माने यांनी ओळखले आणि आणि मला संशोधनाची संधी दिली़ अखेर मी १९९३ मध्ये पीएच़डी़प्राप्त केली़ माहुली गावातून मी पहिलाच व्यक्ती होतो, ज्याने पीएच़डी़ प्राप्त केली होती़ त्यामुळे मला खूप आनंद झाला होता व कुटूंबीयांना सुध्दा़यशस्वी जीवनासाठी वसतिगृहातील प्रवासही महत्वाचा...उच्च शिक्षणासाठी शहरात आलो़ त्यामुळे वसतिगृहात काहीवर्ष राहिलो़ वसतिगृहात कठोर शिस्त होती. पण, हे वसतिगृहातील जीवन खूप वेगळेच़ मोकळीक, बंधन नाही, कुठलाही भेदभाव नाही, जात-धर्म नाही़़सर्व एकत्र राहायचे़ त्यामुळे विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर वसतिगृहातील जीवन जगणे ही महत्वाचे आहे़ वाचनाची आवड असल्यामुळे मी कांदबरी तसेच परीक्षा काळातही पुस्तक वाचणे बंद केले नव्हते, असे त्यांनी सांगितले़

टॅग्स :Jalgaonजळगाव