लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षकांची सहकारी पतपेढीत निवडून आलेल्या संचालकांना अपात्र करण्यात आले होते. या प्रकरणी निवडून आलेल्या संचालकांना अपात्र करता येणार नाही, असा निकाल जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवाई यांनी दिला आहे. याप्रकरणी निवडून आलेले संचालक अजित गुलाबराव पाटील आणि आबा ठाणसिंग कच्छावा यांनी तक्रार केली होती. तसेच स्वीकृत संचालकांबाबत केलेली कृती बेकायदेशीर असल्याचेही बिडवाई यांनी निकाल देताना म्हटले आहे.
या संस्थेत सचिन पाटील आणि भागवत हाडपे ५ सप्टेंबर रोजी झालेल्या सभेत संचालक म्हणून आहेत, तर अर्जदार अजित पाटील आणि आबा कच्छावा यांना अपात्र केल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ही कृती जिल्हा उपनिबंधकांनी बेकायदेशीर मानली आहे. त्यामुळे निवडून आलेल्या संचालकांना अपात्र ठरवता येणार नसल्याचे निकालात म्हटले आहे.