जळगाव : लोकसभा निवडणुाूकीत मतपेट्या ने-आण करण्यासाठी महामंडळाच्या जळगाव विभागाने जिल्हा निवडणूक विभागाला ४३५ बसेस दिल्या होत्या. या बसेसच्या भाड्यापोटी महामंडळाला १ कोटी ५७ लाख रुपये मिळाले असल्याची माहिती विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे यांनी दिली.लोकसभेच्या निवडणुकीसाठी एस. टी. महामंडळाच्या जिल्हाभरातील ११ डेपोंमधून ४३५ बसेसची नोंदणी जिल्हा निवडणूक विभागाकडे करण्यात आली होती. २२ रोजी मतपेट्या पोहचविण्यासाठी सकाळी आठपासूनच या बसेस निवडणूक विभागाच्या ताब्यात देण्यात आल्या होत्या. . तसेच २३ रोजीदेखील मतपेट्या आणण्यासाठी या बसेस दुपारी तीन पासूनच निवडणूक विभागाच्या ताब्यात देण्यात आल्या होत्या. प्रवासी वाहतुकीपेक्षा मतपेट्या वाहतुकीत महामंडळाला एका दिवसात दुप्पट उत्पन्न मिळाले आहे.४३५ बसेसच्या भाड्यापोटी निवडणूक विभागाने महामंडळाच्या जळगाव विभागाला १ कोटी ५७ लाख रुपयांचा धनादेश महामंडळाच्या तिजोरीत जमा केला आहे.यामध्ये सर्वाधिक भाडे २६ लाख ६० हजार ४१२ रुपये इतके भाडे जळगाव आगाराला मिळाले असून, सर्वांत कमी ९ लाख ८४ हजार ४७४ इतके भाडे चोपडा आगाराला मिळाले आहे.तर पोलीस प्रशासनाचे १७ लाख रुपये भाडे :लोकसभा निवडणुकीच्या दिवशी मतपेट्या पोहचविण्यासह ठिकठिकाणच्या गावांना पोलीस बंदोबस्तदेखील एस.टी. बसमधून नेण्यात आला होता.यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाकडे महामंडळाकडून दोन दिवस ६० बसेस पुरविण्यात आल्या होत्या.यांचे भाडे सतरा लाख रुपये झाले असून, ते भाडेदेखील महामंडळाला लवकरच मिळणार आहे.तर पोलीस प्रशासनाचे १७ लाख रुपये भाडेलोकसभा निवडणुकीच्या दिवशी मतपेट्या पोहचविण्यासह ठिकठिकाणच्या गावांना पोलीस बंदोबस्तदेखील एस.टी. बसमधून नेण्यात आला होता. यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाकडे महामंडळाकडून दोन दिवस ६० बसेस पुरविण्यात आल्या होत्या.यांचे भाडे सतरा लाख रुपये झाले असून, ते भाडेदेखील महामंडळाला लवकरच मिळणार आहे.
निवडणुकीमुळे एस.टी. आगार झाले मालामाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 12:44 PM