शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

उमवि कार्यक्षेत्रातील महाविद्यालयीन प्रतिनिधींसाठी ५ रोजी निवडणुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2018 9:24 PM

नवीन विद्यापीठ कायद्यानुसार विद्यार्थी परिषदेसाठी खुल्या निवडणुका यावर्षी होणार नाहीत, हे शासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे यावर्षी विद्यार्थी परिषदेची स्थापना जुन्याच कायद्यानुसार होणार आहेत.

ठळक मुद्दे जुन्याच कायद्यानुसार विद्यार्थी परिषदेची स्थापना विद्यार्थी संघटनांच्या हालचालींना वेगखुल्या निवडणुका होणार नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी

आॅनलाईन लोकमत

जळगाव,दि.१-नवीन विद्यापीठ कायद्यानुसार विद्यार्थी परिषदेसाठी खुल्या निवडणुका यावर्षी होणार नाहीत, हे शासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे यावर्षी विद्यार्थी परिषदेची स्थापना जुन्याच कायद्यानुसार होणार आहेत. त्यानुसार उमवि कार्यक्षेत्रातील महाविद्यालयांमध्ये ५ रोजी निवडणूका घेवून ८ जानेवारीपर्यंत महाविद्यालयातील विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष व सहसचिवांच्या नावांची यादी विद्यापीठाला पाठवावी लागणार आहे.

उत्तर महाराष्टÑ विद्यापीठ प्रशासनाकडून  ५ जानेवारी रोजी महाविद्यालयीन प्रतिनिधी निवडीसाठी निवडणूका घेण्याचा सूचना उमवि कार्यक्षेत्रातील महाविद्यालयांना  दिल्या आहेत. नवीन विद्यापीठ कायदा लागू झाल्यानंतर विद्यार्थी परिषदेसाठी खुल्या निवडणूका होणार असल्याने विद्यार्थी संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले होते. मात्र राज्य शासनाकडून खुल्या निवडणुकांबाबत नियम तयार होवू शकले नसल्याने यावर्षी खुल्या निवडणूका न घेता जुन्याच कायद्याप्रमाणे निवडणूका घेण्याचा निर्णय घेतला. तसेच पुढील वर्षी खुल्या निवडणुका घेण्यात येणार आहेत.

८ पर्यंत अध्यक्ष, सचिवांची यादी पाठविण्याचा सूचनामहाविद्यालयांनी ५ जानेवारी रोजी निवडणूका घेवून महाविद्यालयातील विद्यार्थी परिषदेच्या अध्यक्ष व सचिवांच्या नावांची यादी ८ जानेवारीपर्यंत उमवि प्रशासनाकडे पाठवावी लागणार आहे. त्यानंतर ९ जानेवारी रोजी कुलगुरु महाविद्यालयांकडून आलेल्या विद्यार्थी प्रतिनिधींमधून १५ सदस्यांची (१५ पेक्षा जास्तही असण्याची शक्यता) निवड विद्यापीठ विद्यार्थी परिषदेसाठी करणार आहेत. त्यानंतर ११ किंवा १२ जानेवारी विद्यापीठाकडून कुलगुरु नियुक्त सदस्यांची निवडणूक घेवून विद्यार्थी परिषदेच्या अध्यक्षांची निवड करणार असल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली आहे.

महाविद्यालयांमध्ये निवडणुकांच्या हालचालीमहाविद्यालयांमध्ये सत्र परीक्षा संपल्यानंतर तत्काळ विद्यार्थी परिषदेसाठी निवडणुका होत असल्याने विद्यार्थी संघटनामध्ये जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. महाविद्यालय प्रशासनाकडून नोटीस बोर्डवर विविध विभागातील टॉपर विद्यार्थ्यांची यादी नोटीस बोर्डवर लावली आहे. या विद्यार्थ्यांमधून अध्यक्ष व सचिवाची निवड होणार असल्याने विद्यार्थी संघटनांच्या बैठका सुरु झाल्या आहेत. युवासेना, अभाविप, राष्टÑवादी युवक कॉँग्रेससह, एनएसयुआयकडून देखील महाविद्यालय विद्यार्थी परिषदेवर झेंडा रोवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

खुल्या निवडणुका होणार नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजीनवीन विद्यापीठ कायद्यानुसार खुल्या निवडणुका होणार नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. खुल्या निवडणुका न होणे म्हणजेच राज्यशासनाचे अपयश असल्याचीटीका युवासेनेचे जिल्हाध्यक्ष प्रितेश ठाकुर यांनी केली. तर अभाविप ने देखील खुल्या निवडणुकांच्या मागणीसाठी आंदोलन पुकारणार असल्याचे आधीच जाहीर केले आहे. दरम्यान, राज्यशासन यंदा खुल्या निवडणुका न घेता, जुन्याच कायद्याप्रमाणे विद्यार्थी परिषदेची स्थापना करणार असल्याच्या तयारीत असल्याची बातमी २७ नोव्हेंबरच्या अंकात ‘लोकमत’ने प्रसिध्द केली होती. अखेर लोकमतचे वृत्त खरे ठरले आहे.