जळगाव : अचानक विद्युत दाब वाढल्यामुळे शॉर्ट सर्किट होऊन ओमप्रकाश गुलचंद कवरानी यांच्या घरातील टीव्हीसह फर्निचर जळून खाक झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी सव्वा सात वाजता सिंधी कॉलनीतील लक्ष्मी अर्पाटमेंटमध्ये घडली़ हा प्रकार लक्षात आल्यानंतर महिलांनी आरडाओरड केल्याने शेजारील महिला व युवकांनी पाणी टाकून आग विझविली़ या आगीत तीस ते चाळीस हजार रूपयांचे नुकसान झाले आहे़सिंधी कॉलनी परिसरातील लक्ष्मी अपार्टमेंटमधील ओमप्रकाश कवरानी यांचे फुले मार्केटमध्ये कापड दुकान आहे़ शुक्रवारी सायंकाळी घरातील महिला एका रूममध्ये टीव्ही पाहत बसल्या होत्या. अचानक विद्युत दाब वाढल्यामुळे टीव्हीमधून धुर येऊ लागला़ नंतर काही सेंकदाच अचानक टीव्ही जळून खाक झाला. नंतर त्याला लागून असलेले फर्निचर, पलंगावरील गाद्याही जळाल्या. मनपाचा अग्निक्षमन बंब कर्मचाऱ्यांसह दाखल झाला होता. या आगीत सुमारे तीस ते चाळीस हजाराचे नुकसान झाले असावे, अशी माहिती ओमप्रकाश कवरानी यांनी दिली.
जळगावात विजेच्या अतिदाबामुळे टीव्ही, फर्निचर जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 12:25 PM
सिंधी कॉलनीतील घटना
ठळक मुद्देचाळीस हजारांचे नुकसानकाही सेंकदाच अचानक टीव्ही जळून खाक