लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : बळीराम पेठेतील एका विद्युत रोहित्राला रविवारी दुपारी ४ वाजता अचानक आग लागली. नागरिकांनी धाव घेऊन वेळीच आग विझविल्याने नुकसान टळले. मात्र, यामुळे काही वेळ वीजपुरवठा खंडित झाला होता.
बळीराम पेठेतील डॉ. दशपुत्रे यांच्या दवाखान्यावर विद्युत रोहित्र आहे. या रोहित्राला रविवारी दुपारी ४ वाजता ऑईल गळतीमुळे अचानक आग लागली. क्षणातचं आगीने रौद्ररूप धारण केले होते. हा प्रकार परिसरातील रितेश भाटिया, विजय अग्रवाल, योगेश पाटील, अजय बारसे, रवी दशपुत्रे, राहुल घारपुरे यांना दिसला. त्यांनी आगीच ठिकाणी धाव घेऊन वाळू-मातीच्या साहाय्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. काही वेळातचं घटनास्थळी अग्निशमन दलाचे बंब सुध्दा दाखल झाले होते. अग्निशमन बंबाच्या कर्मचाऱ्यांनी वाळू-मातीच्या मदतीने आग विझविली.
महावितरणकडून तत्काळ दुरुस्ती
आगीच्या घटनेनंतर बळीराम पेठ परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. याबाबत रहिवाश्यांनी महावितरणच्या कार्यालयाशी संपर्क साधल्यानंतर राकेश वंजारी, सागर सदावर्ते, सचिन सपकाळे, घनश्याम सपके, सुनील सपकाळे व मनोज जिचकर हे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर त्यांनी दुरुस्ती करून वीजपुरवठा सुरळीत केला.