कोरोनामुळे महावितरणतर्फे देण्यात आलेली सरासरी बिले अवाजवी असल्याच्या तक्रारी करित, अनेक ग्राहकांनी वीज बिल भरण्याकडे दुर्लक्ष केले आहे. नोटीसा बजावूनही ग्राहक वीजबिलाचा भरणा करत नसल्यामुळे, सध्या जळगाव परिमंडळात एक हजार कोटींच्या घरात थकबाकीचा आकडा पोहचला आहे . ही वसुली करण्यासाठी महावितरणतर्फे फेब्रुवारी महिन्यात जोरदार कारवाई मोहिम राबवून, हजारो थकबाकीदारांचा विजपुरवठा खंडित करण्यात आला. महावितरणच्या या कारवाईला विरोध होत असल्यामुळे राज्य शासनाने पंधरा दिवसांपूर्वी या कारवाईला स्थिगिती दिली होती. त्यामुळे महावितरणची आठवडाभर कारवाई बंद होती. मात्र, मार्च महिना सुरू झाल्यानंतरही सुरूवातीचे दोन ते तीन दिवस कारवाई मोहिम राबविण्यात आली.
इन्फो:
स्थगिती उठविल्यानंतर पुन्हा कारवाई
अधिवेशनात शासनातर्फे वीज पुरवठा खंडित न करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शासनातर्फे हे आदेश मागे घेण्यात आले. त्यामुळे महावितरणतर्फे लगेच जळगाव परिमंडळात थकबाकीदारांविरोधात जोरदार मोहिम राबवायला सुरू केली आहे. थकबाकीदारांकडुन वसुलीसाठी महावितरणतर्फे ३१ मार्च पर्यंत ही मोहिम राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. आतापर्यंत ११ हजार ग्राहकांचा या मोहिमेत वीज पुरवठा खंडित करण्यात आला.
जिल्हानिहाय खंडित वीज पुरवठा
जळगाव जिल्हा : ६ हजार १ ६६
धुळे : २ हजार ९६६
नंदुरबार : १ हजार ९३७
एकूण : ११ हजार ६९ ग्राहकांचा विज पुरवठा खंडित
जिल्हानिहाय खंडित वीज पुरवठा
इन्फो :
गेल्या वर्षभरापासून ग्राहकांनी वीजबिल भरलेले नाही. त्यामुळे थकबाकीदार ग्राहकांविरोधात महावितरणची वसुली मोहिम सुरू असून, या मोहिमे अंतर्गंत ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे. ग्राहकांनी कारवाई टाळण्यासाठी वीज बिल भरून महावितरणला सहकार्य करावे.
फारूख शेख, अधीक्षक अभियंता, महावितरण.