ऑनलाइन लोकमतनंदुरबार, दि. 17 - मार्च 2018 अखेर सातपुडय़ातील सर्वच महसूल गाव व पाडय़ांचे विद्युतीकरण करण्यात येणार असून गरज वाटल्यास मध्यप्रदेशातून वीज विकत घेतली जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोलगी येथे आयोजित आढावा बैठकीत केले.‘मॉडेल गाव’ भगदरी येथे विविध विकास कामांची पहाणी केल्यानंतर मोलगी येथे मुख्यमंत्र्यांनी आढावा बैठक घेतली. बैठकीत विविध विकासाच्या बाबींवर चर्चा करण्यात आली. सातपुडय़ातील विद्युतीकरण आणि आरोग्याच्या प्रश्नावर त्यांनी विशेष लक्ष केंद्रीत केले. मुख्यमंत्री म्हणाले की, जिल्ह्यातील दुर्गम भागातील अनेक गाव व पाडे विद्युतीकरणापासून दूर आहे. भौगोलिक अडचणी असल्या तरी प्रत्येक गाव पाडय़ाच्या घरार्पयत वीज पोहचविण्याचा प्रय} आहे. त्यासाठी मध्यप्रदेशातून वीज विकत घेण्याचीही तयारी आहे. त्यामुळे मार्च 2018 अखेर सातपुडय़ातील सर्व गाव व पाडय़ांचे विद्युतीकरण होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आदिवासी भागात शासकीय अधिकारी, कर्मचा:यांचे 350 पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्याचे अधिकार जिल्हाधिका:यांना देण्यात येणार असल्याचेही त्यांनी घोषीत केले. आदिवासी शेतक:यांच्या जमिनीच्या सिंचन प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले, आदिवासी शेतक:यांना शेततळ्यातून सौर पंपाद्वारे सिंचनासाठी विशेष योजना कार्यान्वीत करण्यात येणार आहे. त्यासाठी मागेल त्याला शेततळे दिले जाणार आहे.दुर्गम भागात कर्मचारी, अधिकारी राहत नसल्याची ओरड आहे. त्यामुळे दुर्गम भागात मध्यवर्ती ठिकाणी अधिकारी, कर्मचा:यांना राहण्यासाठी चांगल्या दर्जाची निवासस्थाने बांधून देण्याचा पॅटर्न राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी घोषीत केले.यावेळी पालकमंत्री जयकुमार रावल, आमदार डॉ.विजयकुमार गावीत, आमदार अॅड.के.सी.पाडवी, आमदार उदेसिंग पाडवी, आयुक्त महेश झगडे. जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी , जिल्हा परिषद सीईओ जी.सी.मंगळे, पोलीस अधीक्षक राजेंद्र डहाळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.दरम्यान, मुख्यमंत्री नियोजित दौ:याच्या अर्धातास अगोदर अर्थात 9.45 वाजता मोलगी येथे पोहचले. मोलगीहूनही ते अर्धातास अगोदर अर्थात 12.45 वाजता शिंदखेडय़ाकडे रवाना झाले.
मार्च 2018 अखेर सातपुडय़ातील सर्व गावांचे विद्युतीकरण - मुख्यमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2017 1:20 PM