आॅनलाईन लोकमत
जळगाव-दि.१०-प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी केंद्र व राज्य शासनाने ‘शाळासिध्दी’ उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमातंर्गत शाळा प्रशासनाने केलेल्या स्वयंमूल्याकनानुसार जळगाव जिल्ह्यातील १ हजार १९० शाळांनी या ‘अ’ श्रेणी प्राप्त केली आहे. या आधारावर राज्यात ‘शाळासिध्दी’ उपक्रमात जळगाव जिल्ह्याने राज्यात अकरावे स्थान पटकाविले आहे.
जानेवारी २०१७ पासून हा उपक्रम सुरु असून, त्याव्दारे पहिल्या मूल्यांकनात शाळांनी स्वयंमूल्याकन करून घ्यावयाचे होते. जिल्ह्यातील ३ हजार ३२४ शाळा सहभागी झाल्या होत्या. त्या पैकी ३ हजार २२६ शाळांनी आपले स्वयंमूल्यांकन करून घेतले. तर ९८ शाळांनी अद्याप स्वयंमूल्याकन करून घेतले नाही. या स्वयंमूल्याकनात शाळेतील भौतिक सुविधा, विद्यार्थ्यांची गुणवत्ता, विद्यार्थ्यांची पटसंख्या, शाळेकडून विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणारे उपक्रम, शिक्षकांची कामगिरी या आधारावर शाळांकडून स्वयंमूल्यांकन करण्यात आले. शाळांनी केलेल्या मूल्यांकनाच्या आधारावर राज्यात पुणे जिल्हा अव्वल आहे. तर अहमदनगर दुसºया स्थानावर आहे.
इन्फो-श्रेणी - शाळांची संख्याअ - १ हजार १९०ब - २ हजार ३३क - ८९
तालुकानिहाय अ श्रेणीतील शाळाअमळनेर - १२६ , भडगाव - २९, भुसावळ- ६१, बोदवड-२४, चाळीसगाव-१०७, चोपडा-५८, धरणगाव-५३, एरंडोल-६१, जळगाव- ६२, जळगाव मनपा - ६५, जामनेर - १२७, मुक्ताईनगर - ६८, पाचोरा-८०, पारोळा-६६, रावेर-९५, यावल- १०८
बोदवड पिछाडीवर तर जामनेरची आघाडीशाळांनी केलेल्या स्वयंमूल्यांकनाच्या आधारावर सर्वाधिक अ श्रेणी प्राप्त केलेल्या सर्वाधिक १२७ शाळा जामनेर तालुक्यातील आहे. तर सर्वात कमी २४ शाळा या बोदवड तालुक्यातील आहे.
बाह्यमूल्यांकन रखडलेदरम्यान, शाळांनी स्वयंमूल्यांकन करून शााळांना श्रेणी वाटून दिल्या आहेत. केंद्रिय विकास मंत्रालयाच्या ‘न्यूपा’ (राष्टÑीय शैक्षणि नियोजन व प्रशासन विद्यापीठ,दिल्ली) कडून हा उपक्रम राबविला जात असून, स्वयंमूल्यांकन झालेल्या शाळांचे आता बाह्यमूल्यांकन करण्यात येणार आहे. शाळांनी स्वयंमूल्यांकन केल्यानंतर महिनाभरात हे मूल्यांकन होणे अपेक्षित होते. मात्र दोन ते तीन महिने होवून देखील जिल्ह्यातील शाळांचे बाह्यमूल्यांकन झालेले नाही.