शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन्ही उपमुख्यमंत्री निवडणूक रिंगणात; विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळू शकतो? जाणून घ्या
2
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
3
'स्विंग स्टेट्स' ठरवणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष! ट्रम्प २० राज्यांत; कमला १० राज्यांत विजयी
4
अखेरची निवडणूक असल्याने माझा सन्मान राखावा; शहाजीबापू पाटलांचं जनतेला भावनिक आवाहन 
5
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
6
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
7
कोण होणार अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प की हॅरिस? 40 वर्षांत ज्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही त्यांनी सांगितलं
8
US Election Share Market : ट्रम्प यांच्या पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत, भारतीय शेअर बाजारात तेजी; निफ्टी २४,३०० च्या वर
9
SSY की SIP…मुलीच्या भविष्यासाठी कुठे गुंतवावा पैसा, कनफ्युज असाल तर समजून कुठे मिळेल जास्त पैसा?
10
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
11
१६ दिवसांत ४८ लाख जोड्या अडकणार रेशीमगाठीत, ६ लाख कोटींची उलाढाल?
12
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
14
'कार्तिकी' यात्रेसाठी रेल्वेकडून विशेष गाड्या, भाविकांसाठी मध्य रेल्वेचे नियोजन
15
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
16
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
17
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
18
'मिरज पॅटर्न' चौथ्यांदा चालेल? भाजपाच्या सुरेश खाडे यांच्यासमोर महाविकास आघाडीचे आव्हान, तानाजी सातपुते यांच्याशी लढत
19
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
20
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल

दारूबंदीसाठी नागदुली येथील महिलांचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 10:34 PM

पोलीस स्टेशन समोर ठिय्या : केल्या दारु भट्टया उध्वस्त

एरंडोल : तालुक्यातील गिरणा नदीच्या काठावरील नागदुली येथील महिलांनी व तरुणांनी २० सप्टेबर रोजी पंचक्रोशीतील गावठी दारूच्या भट्ट्या उध्वस्त करीत पोलीस स्टेशनसमोर ठिय्या मांडल्याने पोलिसांनी त्यांना गावात दारुबंदीचे आश्वासन दिले आहे.दारुबंदीसाठी रुद्रावतार घेतलेल्या या २०० महिलांनी दारुच्या भट्टया उध्वस्त करीत २०० लिटरचे ३५ ड्रम, नवसागर आणि गळलेली दारू तीन ट्रॅक्टर मध्ये भरून दुपारी अडीच ते तीन वाजेच्या दरम्यान त्यांनी एरंडोल पोलीस स्टेशन गाठले. सदर महिलांचा रुद्रावतार पाहून तहसील कार्यालय व पोलीस स्टेशनच्या आवरात कामानिमित्त आलेले नागरिक आवक झाले. यावेळी महिलांनी पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन केले. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पोलीसांनी दारूबंदी करण्याबाबत ठोस आश्वासन दिल्यामुळे त्यांनी आंदोलन मागे घेतले.नागदुली या गावात हात भट्टीची दारू बऱ्याच दिवसापासुन बोकाळली होती.गावात तळीरामांची संख्या वाढत होती. दारूपायी अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. व्यसनाधीन झालेल्या कुटुंबातील मुलामुलींची लग्न देखील जुळत नसल्याचे उपस्थित महिलांनी सांगितले. विशेष महत्वाची बाब म्हणजे नागदुली ग्रामपंचायतीवर मनीषा अहिरे या ग्रामसेविका कार्यरत असुन त्यांनी दारू बंदीसाठी पुढाकार घेतला. त्यामुळे त्यांना दारू विक्रेत्यांनी दमदाटी व धमक्या दिल्या, अशाही तक्रारी पुढे आल्या आहेत. या त्रासाला कंटाळुन व सहानशीलतेचा अंत झाल्यामुळे महिलांनी स्थानिक ग्रामपंचायतीकडे व एरंडोल पोलीस स्टेशनला लेखी निवेदन दिले. विशेष हे की, नागदुली ग्रामपंचायतीने दारूबंदीचा ठराव २१ आॅगस्ट २०१९ रोजी झालेल्या ग्रामसभेत संमत केला आहे. पण तरी सुद्धा दारू व दारूड्ड्यांवर नियंत्रण झाले नव्हते. शेवटी त्रस्त व संतप्त महिलांनी २० सप्टेबर रोजी एरंडोल पोलीस स्टेशन गाठले. दरम्यान रात्री उशिरा पर्यंत एरंडोल पोलीस स्टेशनाला गुन्हा दाखल केला असून ५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे आरोपी पसार झाले असून त्यांचा शोध घेतला जात आहे... अन्यथा आमरण उपोषणआश्वासनानुसार यापुढे दारूबंदी न झाल्यास तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसू असा इशारा देण्यात आला आहे.