शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
3
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
4
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
5
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
6
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
7
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
8
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
9
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
10
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
11
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
12
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
13
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
14
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
15
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
16
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
17
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
18
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
19
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
20
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा

नाराजीचे पडसाद उमटण्याची चिन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 11:04 AM

धुळे तालुका

ठळक मुद्दे शहरात भाजपाचा आमदार तर ग्रामीण मध्ये काँग्रेसचा, महापालिकेत प्रथमच भाजपाला बहुमत

धुळे : गेल्या अनेक वर्षापासून शहरासह तालुक्यात कॉँग्रेस पक्षाचे वर्चस्व राहिलेले आहे. परंतु गेल्यावेळी मोदी लाटेत शहरात प्रथमच भाजपाला संधी मिळाली. तर गेल्यावर्षी झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत भाजपाने निर्विवाद बहुमत मिळविले. पक्षाने मनपात सत्ता मिळविली तरी भाजपाला स्वपक्षाच्या आमदाराच्या टीकेचा सामना करावा लागला. लोकसभा निवडणुकीत भाजप विरूद्ध कॉँग्रेस असा सामना होणार असला तरी, भाजपाला आपल्या पक्षाच्या आमदाराच्या नाराजीचा कितपत फटका बसतो, हे बघणेही औत्सुक्याचे ठरणार आहे.धुळे लोकसभा मतदार संघात धुळे शहर, धुळे ग्रामीण, शिंदखेडा, मालेगाव बाह्य, मालेगाव मध्य व बागलाण या मतदार संघाचा समावेश होतो. लोकसभा निवडणुकीत धुळे शहर व तालुक्याची भूमिका ही निर्णायक ठरणारी आहे. लोकसंख्येचा विचार करता शहराचा वाटा हा मोठा असतो. शहरात महापालिकेचे ७४ प्रभाग आहेत. तर ग्रामीण भागात जिल्हा परिषदेचे १७ गट व ३४ गण आहेत.कॉँग्रेसचेच वर्चस्वधुळे तालुका हा कॉँग्रेसचा बालेकिल्ला आहे. तालुक्यात शहर व कुसुंबा हे दोन विधानसभा मतदार संघ आहेत. त्यात कुसुंबा मतदार संघातून कॉँग्रेसचे माजी मंत्री रोहीदास पाटील हे पाचवेळा निवडून आले आहेत. तर २००९ मध्ये झालेल्या मतदारसंघ पुनर्रचनेत कुसुंबा मतदार संघाऐवजी धुळे ग्रामीण मतदार संघ झाला. या मतदार संघातून पहिल्यांदा शिवसेनेचे प्रा. शरद पाटील हे २००९ मध्ये निवडून आले होते. मात्र पुढच्या निवडणुकीत त्यांना आपली जागा राखता आली नाही. २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत धुळे ग्रामीण मधून माजी मंत्री रोहीदास पाटील यांचे चिरंजीव कुणाल पाटील हे निवडून आले. धुळे मतदार संघातही कॉँग्रेसचे वर्चस्व होते. १९७८ ते १९९० पर्यंत कॉँग्रेसचे उमेदवार निवडून आलेले आहेत. मात्र १९९५ मध्ये प्रथमच अपक्ष म्हणून राजवर्धन कदमबांडे निवडून आले होते. यानंतर धुळे मतदार संघात कधी राष्टÑवादी तर कधी लोकसंग्राम पक्षाचे उमेदवार निवडून आलेले आहेत.बाजार समितीत काँग्रेसचे वर्चस्व असून, सभापतीपदी सुभाष देवरे आहेत. तर पंचायत समितीवर कॉँग्रेस -राष्टÑवादीची सत्ता असून, सभापतीपदी काँग्रेसच्या अनिता पाटील आहेत.एकंदरीत धुळे तालुक्याचा विचार केल्यास कॉँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे.याचा लोकसभा निवडणुकीत कितपत फायदा होतो, ते निवडणुकीनंतरच स्पष्ट होऊ शकणार आहे.मनपात भाजपाला प्रथमच संधी२०१४ मध्ये भाजप-सेना, तसेच कॉँग्रेस- राष्टÑवादी कॉँग्रेस हे स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे गेले होते. परंतु मोदी लाटेत धुळे शहर मतदार संघातून अनिल गोटे हे भाजपतर्फे निवडून आले होते. त्यानंतर २०१८मध्ये झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीतही भाजपाने ५० जागा जिंकून बहुमत मिळवित प्रथमच सत्ता स्थापन केली. धुळे शहर विधानसभा मतदार संघ व महापालिकेत भाजपाने प्रथमच सत्ता मिळविली आहे.आता शहरातूनच आव्हान...महानगरपालिका निवडणुकीपासून भारतीय जनता पक्षात दोन गट निर्माण झालेले आहेत. आमदार अनिल गोटे यांनी पक्षाविरूद्धच बंड पुकारलेले आहे. त्यामुळे भाजपाला खरे आव्हान हे स्वपक्षातूनच आहे. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे व आमदार अनिल गोटे यांच्यातील ‘सख्ख’ सर्वश्रृत आहे. या सर्व गोष्टींचा विचार केल्यास शहरातून भाजपाला आघाडी मिळविणे कठीण जाऊ शकते असा अंदाज जाणकार व्यक्त करीत आहेत.

टॅग्स :Politicsराजकारण