जळगाव : जळगाव महापालिकेच्या वाल्मीक सुपडू सपकाळे (वय ४५, रा.कांचन नगर, जळगाव) या बडतर्फ कर्मचाºयाने आत्महत्या केल्यानंतर वारसाला नोकरीत सामावून घ्यावे व निलंबन अथवा बडतर्फ झालेल्या अन्य कर्मचाºयांनाही न्याय द्यावा या मागणीवरून जिल्हा रुग्णालयात गोंधळ उडाला होता.दरम्यान, संभाव्य धोका लक्षात घेता जिल्हा रुग्णालय व मनपासमोर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आयुक्त चंद्रकांत डांगे यांच्याशी माजी नगरसेवक कैलास सानेवणे यांनी भ्रमणध्वनीवरुन चर्चा केली. त्यांच्याकडून सोमवारी तोडगा काढण्याचे आश्वासन मिळाल्याने सपकाळे यांचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला. आयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून मनपा अभियंता सुनील भोळे जिल्हा रुग्णालयात आले होते. त्यांनी नातेवाईकांशी चर्चा केली. यावेळी पाचशेच्यावर नातेवाईक, मनपा कर्मचारी, संघटनांचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.मनपाच्या अग्निशमन विभागात शिपाई म्हणून कार्यरत असलेल्या वाल्मीक सपकाळे यांना मनपाने तीन महिन्यापूर्वी बडतर्फ केले होते. त्यादिवसापासून ते नैराश्यात होते. त्यातून शनिवारी रात्री साडे दहा वाजता राहत्या घरात वरच्या मजल्यावर त्यांनी गळफास घेऊन जीवन संपविले.मृतदेह मनपात नेण्याचा इशारासपकाळे यांच्या वारसाला तत्काळ नोकरी द्यावी व त्याचे आश्वासन आताच द्यावे यासाठी मनपा अधिकाºयांनी जिल्हा रुग्णालयात यावे, त्यांना येणे शक्य नसेल तर मृतदेह मनपात नेऊ असा इशारा नातेवाईकांनी देताच गोंधळ उडाला होता. प्रभारी महापौर गणेश सोनवणे, माजी नगरसेवक कैलास सोनवणे, आदीवासी वाल्मीक लव्य सेनेचे जिल्हाध्यक्ष मोहन शंकपाळ व इतरांनी आयुक्त चंद्रकांत डांगे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी बांधकाम विभागाचे अभियंता सुनील भोळे यांना जिल्हा रुग्णालयात पाठविले. कैलास सोनवणे यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सोमवारी सकाळी अकरा वाजता बैठक घेऊ, असे आश्वासन डांगे यांनी दिल्याने मृतदेह कांचननगरात नेण्यात आला. त्यानंतर तेथून बारा वाजता मृतदेह वैकुंठधाम येथे नेण्यात आला. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा रुग्णालय व मनपात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता.
जळगावात महापालिकेच्या बडतर्फ कर्मचाऱ्याची आत्महत्या, जिल्हा रुग्णालयात गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 1:25 PM
शनिवारी रात्री साडे दहा वाजता राहत्या घरात वरच्या मजल्यावर त्यांनी गळफास घेऊन जीवन संपविले
ठळक मुद्देतीन महिन्यापूर्वी केले होते बडतर्फ पाचशेच्यावर नातेवाईक, मनपा कर्मचारी, संघटनांचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित