शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

मुक्ताई साखर कारखान्यात कामगारांची कपात

By admin | Published: February 09, 2017 12:32 AM

कामगार आंदोलनाच्या पवित्र्यात : ऊस नसल्याने पगार न परवडणारा

मुक्ताईनगर :  मुक्ताई शुगर अ‍ॅण्ड एनर्जी प्रा लि. येथील काही कामगारांना कामावरून कमी करण्यात आल्याने काही कामगार आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. बुधवारी  काही कामगारांनी कारखान्याचे चेअरमन डॉ. शिवाजी जाधव यांना भेटून कामावर घेण्याची मागणी केली.तीन वर्षांपूर्वीच संत मुक्ताई साखर कारखान्याचे मुक्ताई शुगर अ‍ॅण्ड एनर्जी प्रा. लि.चा  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते शुभारंभ करण्यात आला. त्यासाठी मोठ्या प्रमाणात नोकर भरती करण्यात आली. त्यात काही हंगामी तर काही कायमस्वरूपी कामगारांची भरती करण्यात आली. गेल्या काही दिवसांपूर्वीच जवळपास २०० हंगामी कामगारांना कामावरून कमी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे तर नंतर नुकत्याच काही दिवसांपूर्वी जवळपास  कायमस्वरूपी ३५ कामगारांना कमी करण्याचे आदेश कारखाना प्रशासनातर्फे  देण्यात आले. त्यामुळे कामगारांवर अक्षरश: उपासमारीची वेळ आली आहे. विशेष म्हणजे ज्यांना  कामावरून कमी करण्याचे आदेश दिले आहेत त्यांनाच राजीनामा देण्याचेही सांगण्यात आले आहे व यानंतर पुन्हा एक यादी कामगारांची कमी करण्याची निघणार असल्याचे सांगण्यात आले. या विषयावरून बुधवारी   दुपारी काही कामगारांनी कारखान्याचे चेअरमन डॉ.शिवाजी जाधव यांची भेट घेतली. त्यात रामनाथ धोबी, राजाराम पाटील, अंबालाल अहिरराव, संजय झांबरे, शरद सोनवणे, अंकुश पाटील, आशिष शेजाळे, राज गुप्ता यांचा समावेश होता.कारखाना  खाजगी  असल्याने व ऊस नसल्याने पगार देणे परवडत नाही म्हणून कामगार कपात केल्याचे जाधव यांनी सांगितले असे एका कर्मचाºयाने  सांगितले.  एका कर्मचाºयाने आमचे पगार व अनुभव दाखले अडकले असल्याने आमचे हात बांधले असल्याची हतबलता व्यक्त केली. कामावर न घेतल्यास कामगार आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचे सांगण्यात आले. कोणत्याही कर्मचाºयांचे वेतन थकलेले नाही. आज १५ ते २० कामगार माझ्याकडे आलेले होते त्यांंनी त्यांंचा रजेचा पगार व ओव्हरटाईम या वेतनाबाबत चर्चा करुन मागणी केली मी तत्काळ संंबंंधीतांना वेतनाची रक्कम देण्यास सांंगितले. ज्या कर्मचाºयांनी फंडाची रक्कम मागणी केलेली आहे त्या कर्मचाºयांना तुम्ही राजीनामा दिल्यावरच ती रक्कम मिळेल असे सांंगितले. जे ब्रेक दिलेले हंंगामी कर्मचारी आहेत त्यांंना पुढच्या हंंगामात कामावर परत घेण्यात येईल- डॉ.शिवाजी जाधव, चेअरमन, मुक्ताई साखर कारखाना, घोडसगाव,ता.मुक्ताईनगऱ