महिला म्हटलं म्हणजे अनेक सामाजिक रुढीपरंपरांना सामोरे जाणारा एकमेव घटक होय.रुढ अर्थाने ह्यघराला घरपण ह्यदेणारी ह्यती ह्यएकमेव. तरी पण तिच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंत तिला अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागते. पूर्वी हे प्रश्न मोठ्या प्रमाणात होते. स्त्री जन्म म्हणजे खूपच यातना आणि उपेक्षा असा विषय मागील काळात होता. मात्र काळाच्या ओघात हळुहळु ह्यस्त्री ह्यच्या ह्या वेदना कमी झालेल्या जाणवतात. ह्याचे श्रेय प्रथम महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जाते. क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले यांनी प्रथम सावित्रीबाईंना शिक्षित केले महिला शिक्षण व सबलीकणाचे कार्य सर्वाना ठाऊक आहेच. स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांचे हे कार्य वंदनीय असेच आहे. स्त्रियांसाठी हे खूप मोठे काम फुले दाम्पत्याने केले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सविधान अस्तित्वात आले आणि माता -भगिनींनाही समाजात एक चांगले स्थान प्राप्त होण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरु झाली.-स्नेहा गायकवाड, जि प सदस्या गिरड आमडदे गट ता.भडगाव.
शिक्षण आणि राजकारणाने महिलांचे सबलीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2019 12:27 PM