जळगावातील अजिंठा चौफुलीवरील अतिक्रमण जमीनदोस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:29 PM
जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर, पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांच्यासह पोलीस ताफा तैनात होता
ऑनलाईन लोकमतजळगाव, दि. 20 - अजिंठा चौफुलीवर होणारी वाहतुकीची कोंडी लक्षात घेऊन महापालिकेने या चौकातील चारही बाजुंनी झालेले अतिक्रमण काढण्यास बुधवारी दुपारी सुरुवात केली. पहिल्या टप्प्यात डाव्या बाजूचे सातपुडा अॅटोमोबाईलजवळील अतिक्रमण काढण्यात आले. कारवाईत स्वत: जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर, पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांच्यासह पोलीस ताफा तैनात होता. अजिंठा चौफुलीच्या चारही बाजूने प्रचंड वाहतूक दिवसरात्र सुरू असते. 60 फुटी महामार्ग व 32 फुटी औरंगाबादकडे जाणारा राज्यमार्ग दोन्ही बाजूने अतिक्रमणे झाली आहेत. यामुळे रस्ता अरुंद होऊन वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन ब:याच वेळेस अपघातही होत असतात. ही बाब लक्षात घेऊन या चौकातील अतिक्रमणे काढण्यास आज सुरुवात झाली. दुपारी 4 ते रात्री साडे नऊ वाजेर्पयत साडे पाच तास ही मोहीम सुरू होती. चौकात औरंगाबादकडून येणा:या रस्त्याने डाव्या वळणावर सातपुडा अॅटोमोबाईलजवळ श्रीकृष्ण मंदिर आहे. 1983 मध्ये हे मंदिर या ठिकाणी उभारण्यात आले आहे. वळणाच्या ठिकाणी असलेले हे मंदिर 32 फुटी औरंगाबादकडे जाणा:या राज्य महामार्गावर येते. औरंगाबाकडून येणा:या डाव्या वळणावरील या जागेवर मोठे वृक्ष व त्याचा आधार घेऊन काही अतिक्रमणे होती. यात पाणपोई, जुन्या फर्निचर विक्रीचे दुकान व त्याचाच आधार घेऊन वाहनांच्या रांगा या ठिकाणी लागत असतात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होत असे. ही बाब लक्षात घेऊन ही कारवाई सुरू करण्यात आली. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते मंदिरात पूजा व आरती करण्यात आली. दुपारी 4.30 वाजता या कारवाईस प्रारंभ झाला. तीन जेसीबी व दहा ट्रॅक्टर कारवाईसाठी आणले होते. जेसीबीद्वारे मंदिराची भिंत, परिसरातील वड, ¨पंपळ, निंब, अशी जवळपास 14 लहान, मोठी झाडे तोडण्यात आली. आत असलेले एक आऊटहाऊसही काही मिनिटातच जमीनदोस्त झाले.