अमळनेर : लॉक डाऊन काळातील साथ रोग नियमांचा भंग करणाºया दुकानदार व नागरिकांवर कारवाई करण्यासाठी नियुक्त केलेल्या पथक प्रमुखालाच सार्वजनिक जागी थुंकल्याबद्दल मुख्याधिकारींनीच ५०० रुपये दंड केल्याने कर्मचाऱ्यांमध्ये वचक निर्माण झाला आहे.विनाकारण फिरणारे नागरिक , सोशल डिस्टन्स न पाळणारे हातगाडी चालक व दुकानदार यांच्यावर कारवाई करण्यासाठी नगरपालिकेने अतिक्रमण विभाग प्रमुख राध्येश्याम अग्रवाल यांना नियुक्त केले आहे. २३ रोजी सकाळी तहसीलदार मिलिंद वाघ , मुख्याधिकारी डॉ.विद्या गायकवाड , अतिक्रमण विभाग प्रमुख राध्येश्याम अग्रवाल गस्तीवर असतानाच अग्रवाल सार्वजनिक जागी थुंकले. मुख्याधिकारी गायकवाड यांनी पारदर्शीपणा दाखवून लगेच जागेवर ५०० रुपये दंड करून दंडाची पावती दिली. मुख्याधिकारी गायकवाड यांनी आपल्याच कर्मचाºयाला दंड आकारल्याने त्यांचे कौतुक होत आहे.तसेच फायनल प्लॉट १२३ जुने बसस्टँड परिसर आणि फायनल प्लॉट १२४ भाजीपाला विक्री परिसर या ठिकाणी निश्चित केलेली १५ अतिक्रमणे काढण्याचे आदेश मुख्याधिकारी गायकवाड यांनी अतिक्रमण विभाग प्रमुख अग्रवाल याना दिले आहेत अतिक्रमण काढण्यास टाळाटाळ अथवा हायगयी केल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे.
अतिक्रमण विभाग प्रमुखलाच ५०० रुपये दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 2:09 PM