जळगाव : मंगळवारी कडक निर्बंध संपल्यावर गणेश कॉलनी चौक ते ख्वाजामियाँ दर्गा या परिसरात अतिक्रमण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे सायंकाळी या रस्त्यावर वाहतूक कोंडी होते, तसेच नागरिकांची गर्दी होत असल्याने शारीरिक अंतराचे नियमदेखील पाळले जात नाही.
समतानगरात रस्ते तयार करण्याची मागणी
जळगाव : समतानगर परिसरात सर्वत्र मातीचे रस्ते आहेत. यामुळे सर्वत्र धूळ उडते याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे याठिकाणी किमान चांगले रस्ते तयार करून मिळावेत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
विनामास्क फिरताहेत विक्रेते
जळगाव : हातगाडीवरून शहरात फिरून भाजी विकणारे विक्रेते मास्क काढूनच बाजारात फिरत आहेत, तसेच हे विक्रेते सकाळीच बाजार समितीतून भाजी विकत घेतात. तेथेही गर्दी होते. हे विक्रेते कोरोनाचे सुपर स्प्रेडर ठरण्याची शक्यता आहे. त्यातच ते विनामास्क फिरत असल्याने त्यांच्यावर कारवाईची मागणी होत आहे.
बेशिस्त पार्किंग
जळगाव : मुख्य बाजारपेठ आणि एम.जी. रोडवर बेशिस्त पार्किंग होत आहे. या भागात दोन ठिकाणी पार्किंगची व्यवस्था असली तरी नागरिक रस्त्यावरच वाहन उभे करतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. याकडे वाहतूक पोलीस दुर्लक्ष करत आहेत.