प्रमोद ललवाणीकजगाव, ता.भडगाव, जि.जळगाव : येथील जैन स्थानकात चातुर्मास समाप्तीच्या आदल्या दिवशी अनेक तपस्वींचा सत्कार तसेच मुस्लीम युवकाने आयुष्यभर मांसाहार न करण्याची शपथ घेतल्याने त्याचाही सत्कार समाज बांधवांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. येथील जैन स्थानकात १६ जुलैपासून प.पू.विमलेशप्रभाजी म.सा. यशप्रभाजी म.सा. भक्तीप्रभाजी म.सा. यांच्या सानिध्यात चातुर्मास सुरू होता. यात सकाळी ६ वाजता प्रार्थना, ८.३० प्रवचन, दुपारी २ ते ४ अभ्यास वर्ग, सायंकाळी ७ वाजता प्रतिक्रमण याप्रमाणे संपूर्ण चातुर्मासात कार्यक्रम होत होते. चातुर्मास दरम्यान येथे अनेक तपस्या पार पडल्या. यात दोन मासखमण (३० दिवसाचे निरंकाळ उपवास), २१, १५, ११, ९, ८, ७, ५ दिवसाचे निरंकाळ उपवास याप्रमाणे २९ महिला व पुरुषांनी तपस्या केल्या, तर ६१ महिला व पुरुषांनी ३ दिवसांचे उपवास केले. तसेच आयंबील, एकासना, ब्यासना याप्रमाणेच अनेक तपस्या येथे चातुर्मासादरम्यान पार पडल्या. यात सहा वर्षाच्या बालकांपासून तर ९० वर्षांच्या वयोवृद्ध महिलांचाही सहभाग होता.चातुर्मासात होत असलेल्या प्रवचनात अनेक जैनेतर बांधव व महिला सहभागी झाले होते, तर येथील एक मुस्लीम समाजाचा तरुण भोजू मलिक याने आयुष्यभर मांसाहार न खाण्याची शपथ प.पू.विमलेशप्रभाजी म.सा. यांच्या सानिध्यात घेतली. याशिवाय अनिल महाजन व सागर कुमावत यांनी चातुर्मासात म्हणजे चार महिने मांसाहार न घेण्याची शपथ घेतली होती. तसेच अनेक जैनेतर महिला व पुरुषांनी संपूर्ण चार महिने जैन स्थानकात येऊन प्रवचनाचा लाभ घेतल्याने तसेच तपस्या करणारे महिला व पुरुषाचा सत्कार कजगाव जैन श्रावक संघाच्या वतीने हस्ते करण्यात आला.ताप्रसंगी चार महिने चाललेल्या चातुर्मास दरम्यान संपूर्ण देशभरातून अनेक जैन बांधव व महिलांनी साध्वींच्या दर्शनाचा लाभ घेत धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेतला.उपक्रम यशस्वीतेसाठी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष चेतनजी धाडीवाल यांच्यासह भारतीय जैन संघटना, जैन श्रावक संघ, जैन महिला मंडळ, जैन नवयुवक मंडळ व बहुमंडळ यांनी परिश्रम घेतले.जैन श्रावक संघ कजगावच्या वतीने भोजू मलीक या मुस्लीम युवकाचा विशेष सन्मान तसेच ३६ जैन व जैनेतर महिला व पुरुषाचा तपस्वी बहुमान व चातुर्मास सेवा सन्मानासाठी टॉफी देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
कजगाव येथे चातुर्मासाची समाप्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 3:22 PM
कजगाव येथे चातुर्मासाची समाप्ती झाली.
ठळक मुद्देअनेक तपस्वींचा सत्कारमुस्लीम युवकानेही घेतली आयुष्यभर मांसाहार न करण्याची शपथ