चाळीसगाव : भर उन्हाळ्यात शहरात सर्वच भागात मुबलक पाणी मिळत होते. आमचा घसा मात्र कोरडाच राहिला. यंदा पावसाची आबादानी असली तरी पाण्यासाठी आमची पायपीट थांबलेली नाही. सध्या पाणी मिळतेही पण ‘नैवेद्याला फिरवावे तसे.’ वर्षभरापासून जलकुंभ आहे, पण शोपीस म्हणून. आमचा हा वनवास संपणार कधी? हा कोरडाठाक प्रश्न आहे, मालेगाव रोड स्थित हजारो नागरिकांचा. तथापि पालिका प्रशासन ढिम्म आहे.चाळीसगाव शहरात 75 कोटी खर्चाच्या पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण झाले. यामुळे गत उन्हाळ्यात इतरत्र सगळीकडे दुर्भीक्ष्य असताना शहरवासीयांना पाण्याचे ‘अच्छे दिन’ होते. या योजनेअंतर्गत नव्या विस्तारलेल्या नागरी वस्त्यांसाठी जलकुंभही उभारले गेले. रेल्वे मार्गाच्या पलीकडे किमान 20 हजारांहून अधिक असणा:या लोकसंख्येसाठी मालेगाव रोडस्थित राखुंडेनगरात जलकुंभ उभारण्यात आला. मात्र तो कार्यान्वित न झाल्याने या परिसरातील नागरिकांची पायपीट थांबलेली नाही. पालिकेत सत्ता परिवर्तन झाले असून आतातरी आमचा प्रश्न सुटला पाहिजे, अशी संतप्त मागणी येथील नागरिकांनी केली आहे. तीन कि.मी.वरून होतो पाणीपुरवठाशहरात पाणीपुरवठय़ाचे एकूण 72 झोन आहेत. यापैकी 22 हून अधिक झोन हे डेराबर्डी भागातील जलकुंभाला जोडले आहेत. मालेगाव रोड परिसरात याच जलकुंभावरुन पाणीपुरवठा होतो. येथून हा जलकुंभ तीन-चार कि.मी. लांब असल्याने पाण्याचा अपव्यय होऊन पाणी समस्या उग्र झाली आहे. काही भागात अंतर्गत जलवाहिन्या नसल्याने नागरिकांचे हाल होतात.प्रशासनाचे दुर्लक्ष10 लाख लीटर क्षमतेचा जलकुंभ नव्याने या भागात उभारला गेला आहे. गेल्या फेब्रुवारीत जलकुंभाचे काम पूर्ण झाले असून अंतर्गत जलवाहिन्याचे काम शिल्लक आहे. विशेष म्हणजे बांधकाम पूर्ण झाल्यावर जलवाहिनेचे काम तातडीने होणे गरजेचे होते. मात्र पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष असल्यानेच सुसज्ज जलकुंभ शोपीस झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. याबाबत वेळोवेळी पालिकेकडे गा:हाणे मांडूनही उपयोग झाला नाही, अशी तक्रार नागरिक मांडतात. (वार्ताहर)4 फेब्रुवारीतच मालेगाव रोडवरील जलकुंभाचे काम झाले पूर्ण 4जलकुंभ कार्यान्वित झाल्यास सुरळीत होईल पाणीपुरवठा. आमदारांनी लक्ष घालण्याचीही होतेयं मागणी.4अंतर्गत जलवाहिन्याअभावी नवा जलकुंभ कुचकामी420 हजारांहून अधिक लोकसंख्येची गंभीर समस्या4सद्य:स्थितीत 3 कि.मी.वरुन होतो पाणीपुरवठा 4डेराबर्डीच्या जलकुंभावर 22 झोनचा भार. पाण्याचाही होतो अपव्यय4पालिका प्रशासन दिरंगाई करीत असल्याचा नागरिकांचा रोष4नगराध्यक्षांचाही रहिवास याच भागात, अंतर्गत जलवाहिनी कामाची प्रतीक्षा संपणार कधी ?पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर अंतर्गत जलवाहिनीचे काम पूर्ण केले जाईल. लवकरच जलकुंभाचा लोकार्पण सोहळा करण्यात येणार आहे.- आशालता विश्वास चव्हाण, नगराध्यक्षामालेगाव रोड परिसरात पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर आहे. जलकुंभ सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहे. नगराध्यक्षा व मुख्याधिका:यांसमोर हा प्रश्न मांडला असून लवकरच अंतर्गत पाईप लाईनचे काम करण्यात येईल. -विजया पवार/घृष्णेश्वर पाटील, नगरसेवक
पाण्यासाठी वनवास संपता संपेना
By admin | Published: January 16, 2017 12:29 AM